Union Budget 2024 : दोन्ही बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार अन् आंध्रप्रदेशसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आपला सातवा अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. आजच्या बजेटमध्ये बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून या दोन्ही राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आलाय.
केंद्र सरकारच्या बजेटमध्ये बिहार आणि आंध्रप्रदेशला भरभरून आर्थिक तरतूद कऱण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आपला सातवा अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. आजच्या बजेटमध्ये बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून या दोन्ही राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. आंध्रप्रदेशाला अतिरिक्त 15 हजार कोटी देण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. तर बिहारमध्ये एक्सप्रेस वे बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर बिहारमध्ये औद्योगिक विकास करण्यावर आमचा भर असून बिहारमध्ये रस्ते बांधणीवर भर देण्यात येणार आहे. पटना-पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर-भागलपूर राजमार्ग, बुद्धगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्यासाठी 26 हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे. बिहारमध्ये मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

