AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकप्रिय अभिनेत्याला पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी, एस्केलेटर तोडलं, पोलिसांच्या लाठीचार्जनंतर…

लोकप्रिय अभिनेत्याला पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली... यामध्ये रुग्णालयाचं मोठं नुकसान झालं असून एस्केलेटर देखील तुटलं आहे.... अशात गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला... घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

लोकप्रिय अभिनेत्याला पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी, एस्केलेटर तोडलं, पोलिसांच्या लाठीचार्जनंतर...
Jr NTR
| Updated on: Mar 09, 2026 | 11:50 AM
Share

दमदार सिनेमे आणि सोशल मीडियमुळे सेलिब्रिटींच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे… अशात आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला पाहण्यासाठी चाहते अनेक ठिकाणी गर्दी करतात. आता देखील असंच काही झालं आहे. लोकप्रिय अभिनेत्याची एक झलक जवळून पाहण्यासाठी चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. यामध्ये रुग्णालयाचं नुकसान झालं… अखेर वाढलेली र्गी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्च देखील करावा लागला… ज्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमलेली तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता ज्युनियर एनटीआर आहे.

अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली… सध्या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बेंगळुरूमध्ये किम्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यासाठी ज्युनियर एनटीआर पोहोचलेला. अशात अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. 8 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या क्रार्यक्रमात ज्युनियर एनटीआर याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली… परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला…

ज्युनियर एनटीआर रुग्णालयाच्या उद्धाटनासाठी बेंगळुरूमध्ये पोहोचला, तेव्हा त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली… अशात अभिनेत्याने कारच्या सनरुफमधून चाहत्यांना अभिवादन केलं. त्यानंतर चाहत्यांचा उत्साह आणखी शिगेला पोहोचला आणि मोठ्या संख्येत चाहत्यांनी गर्दी केली… रुग्णालयाच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने चाहते जमले होते, ते घोषणाबाजी करत होते आणि सेल्फीसाठी धडपड करत होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांना न जुमानता चाहत्यांनी बॅरिकेड्स तोडून लॉबीमध्ये प्रवेश केला आणि कार्यक्रमस्थळी पोहोचले.

या चेंगराचेंगरीत अभिनेत्याचा एक चाहता एस्केलेटरवरून खाली देखील पडला… प्रचंड गर्दीमुळे रुग्णालयातील एस्केलेटरचं मोठं नुकसान झालं. रिसेप्शन एरियातील फर्निचरचंही नुकसान झालं आहे. परिस्थिती लवकरच नियंत्रणाबाहेर गेली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. अखेर पोलिसांनी अभिनेत्याला सुखरुप कार्यक्रम स्थळी पोहोचवलं…

सध्या याप्ररणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे… अनेकांनी चाहत्यांचं अभिनेत्यावर असलेल्या प्रेमाचा उल्लेख भयानक आणि वाईट असा केलाय. व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकरी म्हणाला, ‘जगातील सर्वात वाईट फॅनडम’, दुसरा एक नेटकरी म्हणाला, ‘रुग्णालयात असा गोंधळ वाईट आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘या घटनेमुळे स्टारडमची काळी बाजू उघडकीस येते.’, सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा सुरु आहे.

Follow Us
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश