AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मुंबईकरांना मिळणार हक्काचं घर, राज्याच्या अर्थसंकल्पात फडणवीसांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईकरांसाठी देखील काही महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे.

आता मुंबईकरांना मिळणार हक्काचं घर, राज्याच्या अर्थसंकल्पात फडणवीसांची मोठी घोषणा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 06, 2026 | 4:25 PM
Share

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबईत 20 लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी आणि 10 लाख परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, त्यासोबतच  वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करणार . बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करणार . मुंबईतील पर्यटन विकासाला चालना देणार अशा काही घोषणा देखील यावेळी करण्यात आल्या आहेत.

मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या घोषणा 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी मार्गावरील तीन स्थानके फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण होणार. विरार, बोईसर, ठाणे स्थानकाभोवती विकासाचा बृहद आराखडा तयार करणार. अटल सेतूला जोडून 200 चौरस कि.मी. क्षेत्रात तिसरी मुंबई निर्माण करणार.  कर्नाळा, साई चिरनेर, नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफिल्ड शहरे तयार करणार. वाढवण बंदराच्या माध्यमातून 2 लाखांहून अधिक रोजगाराची निर्मिती, मच्छिमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर, आसपासच्या 44 गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार, मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणार अशा महत्त्वाच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत.

यासोबतच  मुंबई महानगर प्रदेशात 20 लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार, 10 लाख परवडणारी घरांची निर्मिती करणार, नवीन झोपडपट्टी होणार नाही, यासाठी ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’ प्रणाली विकसीत करणार, अशा घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. तसेच  मुंबईतील भुयारी मारर्गांसंदर्भात देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भरीव तरतूद,  अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक साक्षर करुन लाभाचे व्यवस्थापन आणि गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार. सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणले जाणार.   राज्यात 27 लाख लखपती दिदी झाल्या, 2026-27 मध्ये आणखी 25 लाख लखपती दिदी करणार. महिला बचतगटांच्या वस्तू उत्पादन, विक्रीसाठी 13 जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार अशा घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...