AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान आता देशभरातून लोकं स्विगी, झेमॅटोच्या मदतीने, या आंदोलकांच्या जेवणाची सोय करत असल्याचं पहायला मिळत आहे.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं
आंदोलकांना देशभरातून पाठिंबा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 21, 2026 | 10:16 PM
Share

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्ली येथील जंतर -मंतवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान सोमवारी आंदोलकांनी थेट संसदेवर मोर्चा काढला, यादरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले, त्यामुळे आता देशभरात वातावरण तापलं आहे. सोमवारी झालेल्या लाठीचार्जनंतर देखील आंदोलकांनी माघार घेतलेली नाहीये, ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीन्याम्यावर ठाम आहेत. पुन्हा एकदा जंतर-मतंरवर आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले आहेत.  देशभरातून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत.

या आंदोलनाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे. देशभरातील लोकं स्विगी, झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून या आंदोलकांच्या जेवणाची सोय करत आहेत. हे लोक स्विगी, झेमॅटोवरून जेवण ऑर्डर करत आहेत, आणि हे ऑर्डर केलेलं जेवणं जंतरमंतरमध्ये आंदोलासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना नेऊन देण्यास सांगत आहेत.  त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था होत आहे. यावरून या आंदोलनाला देशभरातून किती मोठा पाठिंबा मिळत आहे हे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे दिल्लीमधील स्थानिक नागरिक देखील या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहेत. जंतर मंतरवर लंगर सुरू करण्यात आला आहे. ज्यांना जे शक्य आहे, ते अन्नपदार्थ घेऊन नागरिक जंतर मंतरवर येत आहेत, स्थानिक लोकांकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.  सोमवारी घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आंदोलकांना होणाऱ्या मदतीचा ओघ वाढल्याचं दिसून येत आहे. दरम्यान स्थानिक लोकांकडून जंतर मंतरवर लंगर लावला जात आहे.

दरम्यान दुसरीकडे या आंदोलकांना आता विरोधी पक्षांचा पाठिंबा देखील मिळाला आहे. आज सकाळीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील जंतर मंतरवर हजेरी लावली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं आहे.

Follow Us
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी