AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली…

कात्रज येथे एका अल्पवयीन मुलाची सात जणांनी कोयत्याने सपासप वार करत हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण घडले आहे. या प्रकरणात तिघा आरोपींना अटक झाली आहे. त्यांची आज पोलिसांनी धींड काढली....

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली...
pune crime and katraj
| Updated on: Jul 21, 2026 | 9:26 PM
Share

एका सतरा वर्षांच्या तरुणाची कोयत्याने वार करुन सात जणांच्या टोळक्याने जुन्या वादातून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कात्रज येथे सोमवारी रात्री घडला होता. या प्रकरणाने खळबळ उडाली होती आणि गु्न्हेगारांना कोणाचेही भय राहिले नसल्याने कायदा सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाल्याने टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करीत यातील चार आरोपींना अटक करीत त्यांची भरपावसात पोलीस व्हॅनला बांधून आज धिंड काढली.

कात्रज येथील १७ वर्षीय तरुण मोबाईल दुरुस्तीसाठी मित्रांसोबत गेला होता. तेथे त्याला गाठून जुन्या वादातून त्याच्या सात जणांना कोयत्याने सपासप वार केले आणि त्याला तसेच जखमी अवस्थेत सोडून हे तरुण पळून गेले. या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गणेश रविंद्र माळवे (वय १७ ) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या अल्पवयीन तरुणाचा अशा प्रकारे निर्घृण खून झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत चार जणांना अटक केली आहे.या आरोपी तरुणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी आज पोलीस व्हॅनच्या बोनेटवर बांधून भर पावसात त्यांची शहरात धिंड काढण्यात आली आहे.

अल्पवयीन तरुणाची अशा प्रकारे झालेल्या हत्येमुळे त्याच्या पालकांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याबाहेर गोंधळ घालत आक्रोश व्यक्त केला. आरोपींना पोलिसांनी आपल्यासमोर हजर करावे अशी मागणी या मुलाचे पालक करत होते.यावेळी नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा गोंधळ घातला. या हत्येच्या प्रकरणातील सर्व आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

सात जणांवर खुनाचा गुन्हा

गणेश याच्या हत्ये प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी एकूण सात जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या तिघा आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भारती विद्यापीठ पोलिस उर्वरित आरोपीच्या शोध घेत असून लवकरच सगळे आरोपी अटक केले जातील असे आश्वासन पोलिसांनी पीडीताच्या नातेवाईकांना दिले आहे.

उर्वरित तिघा आरोपींचा शोध सुरु

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एकूण 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना ताब्यात घेतले असून फरार असलेल्या उर्वरित तिघा आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे कात्रज – पुणे  आणिआसपासच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भारती विद्यापीठ पोलिस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...