AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन याला आधीच आला होता सियाचा संशय,पण वडीलांनी सांगितले की…

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात अनेक बाबी समोर आल्या आहेत. केतन याला सियाचा संशय आला होता.त्याने वडिलांना देखील ही बाब सांगितली होती. परंतू ..

केतन याला आधीच आला होता सियाचा संशय,पण वडीलांनी सांगितले की...
Ketan Agarwal case
| Updated on: Jun 30, 2026 | 8:55 PM
Share

पुणे येथील रिअल इस्टेट एजंट केतन अग्रवाल याच्या हत्येचा तपासात एकापाठोपाठ महत्वाची माहिती मिळत आहे. केतन अग्रवाल याला सिया गोयल या आपल्या होणाऱ्या पत्नीचा एक बॉयफ्रेंड असल्याचा संशय आला होता असे तपासात उघड झाले आहे. केतन याने त्याच्या आई-वडीलांकडे या संदर्भात चर्चा देखील केली होती. तुम्ही लग्न ठरवण्याआधी सियाची पार्श्वभूमी नीट तपासली होती का असा सवाल केतन याने आई-वडीलांना केला होता.

केतन आणि सिया याचं लग्न या वर्षी नोव्हेंबरात होणार होते. परंतू पोलिसाच्या तपासानुसार लग्नाच्या आधी नात्यात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या केस नुसार केतन याची हत्या १८ जून रोजी लोहगडावरुन दरीत ढकलून केली होती. सिया गोयल ( २० ) आणि तिचा प्रेमी चेतन चौधरी ( २२) यांनी डोंगरावरुन धक्का मारुन खाली पाडले. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक झाली आहे.

सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. केतन याचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितले की त्यांच्या मुलाने अनेकदा सिया आणि चेतनच्या जवळीकीने चिंता व्यक्त केली होती. त्याचे म्हणणे असे होते की सिया नेहमी बोलताना चेतनचे नाव घेते. केतन हेही जाणवले होते की जेव्हा तो सियाला फोन करायचा तेव्हा सिया हीचा फोन अनेकदा बिझी असायचा.

पोलिसांच्या तपासात आढळले की सिया आणि केतन यांच्या लग्नाच्या आधी त्यांनी इंडोनेशियातील बाली येथे एका ट्रीपचे आयोजन केले होते. सिया हीला या सहलीला जायचे नसल्याने तिने त्याचा पासपोर्ट गहाळ केला. ६ जूनची ही सहल रद्द झाल्यानंतर केतन त्याच्या वडीलांकडे गेला. सिया छोट्या -छोट्या गोष्टींवरुन भांडते अशी तक्रार केली. तेव्हा त्याच्या वडीलांनी ती वयाने तुझ्यापेक्षा लहान आहे.यामुळे ती असे वागत असेल..

१४ जूनलाही केतनला ढकल्याचा प्रयत्न

केतनच्या वडिलांनी त्याला आश्वस्थ केले होते की सिया हीचे चांगले काऊन्सिंग करु. हत्येचा चार दिवस आधी १४ जूनला देखील केतन आणि सिया लोहगडला गेले होते. हीच तिच जागा होती जेथे १८ रोजी केतनला दोघांनी दरीत ढकलल्याने त्याचा मृत्यू झाला होता. १४ जून रोजी देखील सियाने केतनला डोंगरावरुन ढकल्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी झाडांना पकडल्याने केतन वाचला होता. केतनने आश्चर्यचकीत होत त्याच्याकडे पाहिले तर सियाने येथे साप दिसल्याने आपण घाबरल्याने असे झाल्याचा दावा केला.

पोलिसांच्या मते केतनला सियाचा संशय आला होता. सियाचे कोणा बरोबर तरी अफेअर सरु असल्याची कुणकुण त्याला लागली होती. मात्र कुटुंबियांनी त्याला समजावले की चिंता करुन नको सियाचे कुटुंब चांगले ओळखीचे आहे. केतन आणि सिया यांची भेट मॅचमेकिंगद्वारे झाली होती. दोन्ही कुटुंबांच्या कॉमन नातेवाईकाने हे नातं ठरवले होते. फेब्रुवारीत पुण्याच्या शानदार हॉटेलात दोघांचा साखरपुढा झाला होता.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात