पुढचे 18 महिने कठीण, राहु केतूमुळे तीन राशींपुढे नवे आव्हान, काय होणार?
राहू-केतूचे गोचर धनु राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक आघाडीवर काही आव्हाने निर्माण करू शकते. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता आहे.

ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांना विशेष महत्त्व आहे. या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर होत असल्याचे मानले जाते. 25 नोव्हेंबर 2026 रोजी राहू-केतूचे महत्त्वपूर्ण गोचर होणार असून, यामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आनंद भारद्वाज यांच्या मते, या गोचराचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल. मात्र, तीन राशींच्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
25 नोव्हेंबरला राहू-केतूचे महत्त्वपूर्ण गोचर
ज्योतिषीय गणनेनुसार, 25 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 4 वाजून 34 मिनिटांनी राहू आणि केतू राशी परिवर्तन करतील. या गोचरात राहू मकर राशीत, तर केतू कर्क राशीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. या ग्रहस्थितीचा प्रभाव पुढील 18 महिन्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे करिअर, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक संबंध आणि वैयक्तिक निर्णयांमध्ये बदल जाणवू शकतात.
तूळ राशीच्या व्यक्तींनी भावनिक निर्णय टाळावेत
केतूच्या गोचरामुळे तूळ राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक आणि भावनिक आयुष्यात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. या काळात एकांतात राहण्याची इच्छा वाढू शकते. छोट्या गोष्टींचाही मनावर परिणाम होऊन विनाकारण चिंता सतावू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ नयेत यासाठी संवाद आणि संयम राखणे महत्त्वाचे ठरेल.
धनु राशीच्या खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता
राहू-केतूचे गोचर धनु राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक आघाडीवर काही आव्हाने निर्माण करू शकते. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. या काळात नवीन गुंतवणूक किंवा एखादी मोठी आर्थिक योजना सुरू करण्याचा विचार मनात येऊ शकतो. मात्र, कोणताही निर्णय घाईघाईने न घेता पैशांच्या व्यवहारात विशेष सतर्कता बाळगावी.
मकर राशीच्या करिअरमध्ये संधी, पण बोलण्यावर नियंत्रण ठेवा
राहू मकर राशीत प्रवेश करत असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये महत्त्वाकांक्षा वाढू शकते. करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा निर्माण होईल. भविष्यातील प्रगतीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळू शकते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना शब्दांचा योग्य वापर करा आणि कोणत्याही वादात अडकणे टाळा.
