बहिणीसोबतच क्रिकेटरनं थाटला संसार; आता पाच मुलींचा बाप, दिग्गज खेळाडूची लव्हस्टोरी गाजली
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या कुटुंबाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. पत्नी नादिया आणि पाच मुलींसोबत त्याचं कुटुंब चर्चेत असतं. त्याची मुलगी अंशा हिचा विवाह पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी झाला आहे. शाहिद आफ्रिदीच्या कुटुंबात कोण कोण आहे जाणून घेऊयात...

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा जगप्रसिद्ध खेळाडू आहे. संपूर्ण जगामध्ये त्याच्या दमदार क्रिकेट कारकिर्दीची चर्चा होते. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींबाबत मात्र अनेकांना माहिती नाही. त्याची पत्नी कोण आहे, ती नेमकं काय करते असे अनेक प्रश्न अनेकांना आहेत, चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
शाहिद आफ्रिदीची पत्नी ही त्याच्या मामाची मुलगी आहे. म्हणजेच ती त्याची मामे बहीण आहे. तिचं नाव नादिया आफ्रिदी आहे. २१ ऑक्टोबर २००० साली त्यांनी निकाह केला होता. नादिया चांगली उच्चशिक्षित असून ती पेशाने डॉक्टर आहे. तिने वैद्यकीय पदवी संपादन केलेली आहे. मात्र सध्या तरी ती एक गृहिणी म्हणूनच आपल्या कुटुंबासोबत राहते आहे.
कुटुंबात कोण कोण?
शाहिद आफ्रिदीच्या कुटुंबा इतर सदस्यांबद्दल सांगायचं झाल्यास शाहिद आणि नादिया यांना एकू पाच मुली आहेत. त्यांची सर्वात मोठी मुलगी अक्सा आफ्रिदी आहे. तिच्यानंतर अंशाचा जन्म झाला. त्यानंतर अजवा आफ्रिदी, अस्मारा आफ्रिदी आणि अरवा आफ्रिदी यांचा क्रमांक लागतो. अरवा ही शाहिदची सर्वात लहान मुलगी आहे.
दरम्यान, आता शाहिदच्या मुली मोठ्या झाल्या आहेत. अंशा आफ्रिदीने आता पाकिस्तानचा सर्वात वेगवान गोलंदाज आणि स्टार खेळाडू शाहीन शाह आफ्रिदीसोबत निकाह केला आहे. या जोडप्याने ३ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली आहे. एवढच नाही तर त्यांना आता आलियार आफ्रिदी नावाचा एक मुलगाही आहे. ज्याचा जन्म २०२४ मध्ये झाला आहे.
शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे?
शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तानचा खेळाडू म्हणून जगात डंका वाजवला आहे. त्याने १९९६ ते २०१६ या त्याच्या कारकीर्दीत पाकिस्तानसाठी एकूण ५१८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५०२ डावांमध्ये २४.१२ च्या सरासरीने ११ हजार १४८ धावा ठोकल्या आहेत. एवढच नाही तर तो पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा १०वा फलंदाजही आहे.
याशिवाय पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याबाबत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या सबंध कारकीर्दीत पाकिस्तानसाठी ५३८ विकेट घेतले आहेत.
