AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून शिकवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

बालपणात मुलांना दिलेली ही शिकवण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग बनतो. यासाठी मुलांना वयाच्या 5 व्या वर्षापासून कोणत्या सवयी मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत करतील ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून शिकवा 'या' 5 महत्वाच्या गोष्टी
| Edited By: | Updated on: Feb 12, 2026 | 3:56 PM
Share

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने सुसंस्कृत, बुद्धिमान, प्रामाणिक आणि यशस्वी व्हावे असे वाटते. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही लहानपणापासूनच तुमच्या मुलांना काही सवयी शिकवल्यात. कारण बालपणात घातलेला हा पाया त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग बनतो. या चांगल्या सवयी मुलांना मानसिकदृष्ट्याही मजबूत बनवतात. खरं तर वयाच्या 5 वर्षानंतर मुलं दररोज शिकलेल्या गोष्टींचा सराव करू लागतात. काही गोष्टी मोठ्याच्या वागण्या बोलण्यातून शिकत असतात. त्यामुळे मुलांना या वयात काही गोष्टी समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची त्यांची क्षमता विकसित होते आणि अनेक सवयी आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात. याकरिता प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांना या 5 महत्वाच्या गोष्टी नक्की शिकवा. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

5 वर्षांच्या मुलांना हे शिकवा

खरं बोलायला शिकवा

मुलांना खरं बोलण्याची सवय लावा. मुलांना खरं बोलण्यास प्रोत्साहित करा. मुलांना हे शिकवणे महत्वाचे आहे की चुकीची गोष्ट करणे म्हणजे चुकचं असते, त्यामुळे ती लपवण्यासाठी खोटे बोलणे चुकीचे आहे. यामुळे त्यांना प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास दोन्ही विकसित होण्यास मदत होते.

नाही म्हणायला शिकवा

बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टी नाही म्हणायला विचार करत असतो. पण मुलांना नाही म्हणायला शिकवणे खूप महत्वाचे आहे. जर त्यांना एखादी गोष्ट किंवा बोलण आवडत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीचे वर्तन वेगळ वाटत असेल तर त्यांना नाही म्हणता आले पाहिजे. ही सवय त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील महत्त्वाची आहे.

आदर करायला शिकवा

मुलांना त्यांच्या वडिलधाऱ्या माणसांचा व मोठ्यांचा आदर करायला शिकवा. मोठ्यांचा आदर करणे हे त्यांच्या संगोपनात रुजले पाहिजे. यामुळे त्यांना सभ्य माणूस बनण्यास आणि मानवतेची कदर करण्यास शिकण्यास मदत होईल.

वेळेचे मूल्य पटवून द्या

वेळेपेक्षा मौल्यवान काहीही नाही. एकदा वेळ निघून गेला की, तो निघून जातो; वेळ कधीही परत येत नाही. मुलांना प्रत्येक कामासाठी वेळ निश्चित करण्यास प्रोत्साहित करा. यामुळे त्यांना वेळेचे मूल्य लगेच समजेल. यामुळे त्यांच्यात शिस्तीची भावना निर्माण होण्यास मदत होईल.

सॉरी आणि थँक्स म्हणण्यात काहीच गैर नाही

तुमच्या मुलांना “धन्यवाद,” “माफ करा,” आणि “प्लीज” म्हणण्याची सवय लावा. त्यांना या छोट्या शब्दांचे मूल्य शिकवा. मुलांना पराभव स्वीकारण्यास देखील शिकवले पाहिजे जेणेकरून ते कधीही अपयशाची भीती बाळगू शकणार नाहीत.

मुलांनाही या सवयी शिकवा

मुलांना स्वच्छतेबद्दल आणि योग्य आणि अयोग्य यांचे महत्त्व शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना मोबाईल फोन आणि स्क्रीनपासून दूर राहण्यास प्रोत्साहित करा. पुस्तके, खेळ आणि बोलण्यास प्रोत्साहित करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.