AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak : भारत-पाकिस्तान मॅचसाठी न भूतो न भविष्यती गर्दी… फ्लाइट्स-हॉटेल हाऊसफुल्ल, दरही गगनाला; उद्या थेट…

भारत-पाकिस्तान T20 वर्ल्ड कप सामन्यासाठी कोलंबोमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. या हाय-व्होल्टेज मॅचमुळे हॉटेल्स आणि फ्लाइट्सचे दर गगनाला भिडले आहेत. जाहिरात स्लॉट्सच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली असून, कंपन्या मोठी रक्कम मोजायला तयार आहेत. या सामन्याची क्रेझ पाहता क्रिकेटप्रेमींचा उत्साह आणि आर्थिक परिणाम विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

Ind vs Pak : भारत-पाकिस्तान मॅचसाठी न भूतो न भविष्यती गर्दी... फ्लाइट्स-हॉटेल हाऊसफुल्ल, दरही गगनाला; उद्या थेट...
भारत वि. पाकिस्तान सामना
| Updated on: Feb 14, 2026 | 1:04 PM
Share

आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्ड कपमध्ये उद्या रविवारी 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये रोमांचक सामना होणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. उद्या होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर कोलंबोमध्ये दाखल झाले आहेत. काही रवाना होत आहेत. तर श्रीलंकेतील नागरिकही हा सामना पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. या सामन्याची एवढी क्रेझ झालीय की जाहिरातीच्या दरातही प्रचंड पटीने वाढ झाली आहे. या मॅचच्या व्ह्यूवरशीपचा फायदा उचलण्यासाठी कंपन्यांनी बाह्या सरसावल्या आहेत. कंपन्यांनी ॲड स्लॉट घेण्यासाठी प्रचंड पैसा मोजायला सुरुवात केली आहे. तर कोलंबोत क्रिकेटप्रेमींचा जनसागरच उसळल्याने फ्लाइट आणि हॉटेलचे दरही गगनाला भिडले आहेत.

उद्याच्या सामन्याबाबत असलेली क्रेझ आणि त्यामुळे अचानक वाढलेले रेट यावरू इंडस्ट्री एक्सपर्ट्सनी मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, या हाय व्होल्टेज सामन्यासाठी 10 सेकंदाच्या टीव्ही ॲड स्लॉट करता 30 तर 40 लाख रुपये रेट आकारला जात आहे. साधारणपणे मोठ्या वर्ल्ड कपवेळी हाच रेट 20 ते 25 लाख असतो. यावरून भारत-पाकिस्तान सामन्याची किती मोठी क्रेझ आहे हे पाहा. शेवटच्या काळात ॲड स्लॉट्सच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मॅचच्यावेळी तर प्रत्येक सेकंदाचा स्लॉट विकला जाणार आहे. ब्रॉडकास्टर जिओस्टारला संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जवळपास 2000 कोटीची कमाई एकट्या अॅडमधून होण्याची शक्यता आहे, असं एक्सपर्टचं मत आहे.

जाहिरातीचा स्लॉट मिळवण्यासाठी धडपड

डीजिटल स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारवरही ॲड रेट्समध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी 10 सेकंदाचा ॲड स्लॉट 15 ते 20 लाख रुपये पोहोचला आहे. ऑटोमोबाईल, एफएणसीजी, फायनान्स, विमा आणि रिअल इस्टटे कंपन्या ॲड  स्पेससाठी सर्वाधिक इंटरेस्ट दाखवत असल्याचंही तज्ज्ञ सांगत आहेत.

या टी-20 वर्ल्डकपमध्ये जाहिरात देणाऱ्या कंपन्यांमध्ये अमिरेट्स, अमूल, ओपन एआय, हुंदई, महिंद्रा अँड महिंद्रा तसेच ब्रिटानियासह अनेक महत्त्वाचे ब्रँड सामील आहेत. मार्केटिंग एक्सपर्ट्सच्या मते ॲड रेट्सची तुलना सोन्या चांदीच्या भावाने केली जात आहे.

विमानाचे तिकिट महागलं

तर भारतातून कोलंबोला जाणाऱ्या फॅन्सची संख्याही वाढली आहे. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म EaseMyTripच्या मते राऊंड ट्रिप एअरफेयर सामान्य दिवसांच्या तुलनेत 45 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. 15 फेब्रुवारी विकेंडसाठी कोलंबोला जाणाऱ्या बुकिंगमध्ये तीन दिवसात दुप्पट वाढ झाल्याचं MakeMyTrip ने स्पष्ट केलंय. तर क्लिअर ट्रिपच्या मते, भारत पाकिस्तान सामन्यामुळे कोलंबोची बुकिंग 65 टक्क्याने वाढली आहे. विशेष म्हणजे भारतातील बड्या शहरातील फॅन्सही बुकिंग मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

हॉटेलचे भावही गगनाला…

कोलंबोतील हॉटेलचे दरही गगनाला भिडले आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फोर आणि फाईव्ह स्टार होटलची मागणी सर्वाधिक होऊ लागली आहे. तर प्रीमियम हॉटेलचे रुम इतर सीजनच्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी महागात मिळत आहेत. मॅचमुळे कोलंबोतील सर्व हॉटेल हाऊसफुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत, असं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे.

Follow Us
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!