AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Purity: सोने-चांदी किती शुद्ध? तुमच्या मोबाईलद्वारेच ओळखा, कसे ते जाणून घ्या

Gold-Silver Purity: सध्या सोने आणि चांदीच्या किंमतींनी ग्राहक हैराण आहेत. त्यातच मौल्यवान धातूच्या शुद्धतेविषयी सगळेच जण सजग आणि जागरूक झाले आहेत. तुमच्या मोबाईलद्वारेच हे तपासता येईल. कसे ते जाणून घ्या.

Gold-Silver Purity: सोने-चांदी किती शुद्ध? तुमच्या मोबाईलद्वारेच ओळखा, कसे ते जाणून घ्या
सोने-चांदी किती शुद्ध?Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 14, 2026 | 2:29 PM
Share

How pure is your Gold or Silver: देशात सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढत आहेत. या धातुच्या शुद्धतेची तपासणी करणे आवश्यक आहे. अनेकदा चकाकते ते सोने नसते ही म्हण आपल्याला आठवते. कारण सोने शुद्ध नसेल तर आपले मोठे नुकसान होते. पण आता खिशातील मोबाईलद्वारे तुम्हाला सोने आणि चांदीची शुद्धता तपासता येईल. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. त्यामुळे तुमची फसवणूक तर केली जात नाही ना हे तुम्हाला तपासता येणार आहे.

सोने आणि चांदीची शुद्धता अशी तपासा

भारतात सोने आणि चांदीची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्किंगची व्यवस्था लागू आहे. त्यावर BIS (Bureau of Indian Standards) चे नियंत्रण असते. हॉलमार्किंगचा मुख्य उद्देश ग्राहकांना शुद्धतेसंबंधीच्या फसवणुकीपासून वाचवणे हे आहे. ही एक सरकारी हमी आहे. त्याआधारे सोने आणि चांदी किती शुद्ध आहे हे तपासले जाते. भारताच्या सोने आणि चांदीच्या बाजारात हॉलमार्किंगला विशेष महत्त्व आहे. हे दोन्ही धातू हॉलमार्किंगच्या परीघात आहेत.

हॉलमार्कचा अर्थ काय?

हॉलमार्क हे एखाद्या दागिन्यातील शुद्ध धातुचे योग्य प्रमाण किती हे सांगते. त्यावर शुद्धतेची मोहर लावते. हे BIS च्या नियमानुसार करण्यात येते. सप्टेंबर 2025 पासून प्रत्येक चांदीच्या दागिन्यावर BIS लोगो, ‘SILVER’ शब्द, त्याची शुद्धता आणि एक युनिक HUID क्रमांक द्यावा लागतो.

सोने आणि चांदीच्या शुद्धतेसाठी ग्रेड

भारताच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी 6 कॅरेट ग्रेड मान्य आहेत. त्यात 14K (585), 18K (750), 20K (833), 22K (916), 23K (958) आणि 24KS (995) याचा समावेश आहे.

चांदीच्या शुद्धतेसाठी 7 ग्रेड निश्चित

800, 835, 925, 958, 970, 990 और 999

मोबाईलद्वारे अशी तपासा सोन्याची शुद्धता?

BIS ने यासाठी BIS Care App उपलब्ध करून दिले आहे. हॉलमार्क सोने खरेदी करताना या तीन गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे. यामध्ये BIS लोगो, कॅरेट/फायननेस ग्रेड (उदा.22K916) आणि 6 अंकांचा अल्फान्यूमेरिक HUID क्रमांक याचा समावेश आहे.

BIS Care ॲपमध्ये ‘Verify HUID’ पर्यायावर जाऊन HUID टाका

हे केल्यावर तुम्हाला सराफाचे नाव, हॉलमार्किंग सेंटर, दागिन्याचा प्रकार आणि हॉलमार्किंगची तारीख समोर येईल

चांदीची शुद्धता अशी ओळखा

चांदीच्या दागिन्यांवर HUID क्रमांक पाहा

BIS Care ॲप डाऊनलोड करा

आता HUID क्रमांक टाकून सविस्तर माहिती तपासा

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?