AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dawood Ibrahim : आपल्याकडे बॉम्बस्फोट झाला तेव्हा…दाऊद इब्राहिमसोबत गोविंदाची होती खास मैत्री; प्रसिद्ध लेखिकेनं केलेला मोठा दावा

Govinda And Dawood Ibrahim Friendship : लेखिका अनिता पाध्ये यांनी एका मुलाखतीत गोविंदा आणि दाऊद इब्राहिम यांच्या मैत्रीबद्दल दावा केला होता.

Dawood Ibrahim : आपल्याकडे बॉम्बस्फोट झाला तेव्हा...दाऊद इब्राहिमसोबत गोविंदाची होती खास मैत्री; प्रसिद्ध लेखिकेनं केलेला मोठा दावा
| Updated on: Nov 19, 2026 | 7:32 PM
Share

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील संबंधांची चर्चा अनेक वर्षांपासून होत आली आहे. 1990 च्या दशकात तर अंडरवर्ल्डचा चित्रपटसृष्टीवर मोठा प्रभाव असल्याचं बोललं जायचं. अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडली गेली होती. आता प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी अभिनेता गोविंदा आणि दाऊद इब्राहिम यांच्या मैत्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. गोविंदा शूटिंग सोडून वारंवार दुबईला जायचा, असा दावा त्यांनी केला आहे.

गोविंदा आणि दाऊदची होती मैत्री

‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत अनिता पाध्ये म्हणाल्या की, ‘मला गोविंदाचा खूप वाईट अनुभव आलेला. आधी आमची चांगली मैत्री होती. त्याला आजूबाजूला चेले ठेवायची खूप सवय आहे. जेव्हा आपल्याकडे बॉम्बस्फोट झाला, तेव्हा दाऊदशी जोडलेली अनेक सिनेमातील लोकांची नावं समोर आलेली आणि हा तर सारखा शुटिंगसोडून दुबईला डान्ससाठी जायचा. त्यामध्ये गोविंदाचं नाव जास्त होतं. त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अंडरवर्ल्ड खूप होतं. काही सेलिब्रेटींचे फोटो आले होते ह्या लोकांसोबत. तर त्यांची लिस्ट आलेली.’

‘काही कलाकारांची चौकशीसुद्धा झालेली. गोविंदाचं त्यामध्ये नाव होतं आणि मला सांगितलं गेलं की, त्याची मुलाखत घे आणि दाऊदबद्दल तो काय बोलतोय ते बघ. वर्सोवाला आतमध्ये एक बंगला होता, तिथे मी गेले. हा तर कधी वेळेत यायचा नाही. आज त्याची जी परिस्थिती आहे ना, ती तो डिसर्व्ह करतो. कारण, आधी तो असा वागला आहे. मी गेले तर हा तीन-साडे तीनला आला. त्यानंतर मी रेकॉर्ड करत होते, छोट्या टेपरेकोर्डवर. मी दाऊदचा विषय काढला. त्याने मग दाऊद काय माझा मित्र आहे, असं म्हणत त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळायला सुरुवात केली.’

‘मी त्यानंतर त्याला बाकी प्रश्न विचारले. मी निघणार तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं आपण चुकीचं बोललोय. त्याने मला थांबवलं आणि म्हणाला, मला टेप रेकॉर्डर ऐकव, मी काहीतरी चुकीचं बोललोय. मी त्याला म्हटलं, तू पब्लिक फिगर आहेस, त्यामुळे तू बोलताना तारतम्य ठेवायला पाहिजे होतंस. मग तो मला म्हणाला, तू मला जेलमध्ये टाकशील. त्याने माझी कॅसेट काढून घेतली. मी त्याला म्हटलं, मला कोणीही वीस वर्षांनी जरी विचारलं ना, तरी मी खरं सांगेन. त्यानंतर मग आमच्या संपादकांनी सांगितलं की, आपण हे नको छापूया.’ असं अनिता यांनी शेवटी सांगितलं.

Follow Us
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज