AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Raut On Eknath Shinde: ‘एकनाथ शिंदे डरपोक, शायना एनसींवर कारवाई होणार नाही..’, सुनील राऊत संतापले!

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून राज्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलने होत आहेत. यावेळी बोलताना ठाकरेंचे आमदार सुनील राऊत यांनीही एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

Sunil Raut On Eknath Shinde: 'एकनाथ शिंदे डरपोक, शायना एनसींवर कारवाई होणार नाही..', सुनील राऊत संतापले!
| Updated on: Nov 19, 2026 | 7:28 PM
Share

रंजीत इंगळे, प्रतिनिधी: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉगिंग द जर्नी ऑफ लव’ या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत शायना एनसी यांनी हे कृत्य केले. यावरु शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून राज्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलने होत आहेत. यावेळी बोलताना ठाकरेंचे आमदार सुनील राऊत यांनीही एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भांडूपमध्ये शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून शायना एनसी यांचा निषेध करण्यासाठी भांडूपमध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक एकवटलेत. यावेळी हातात पोस्टर घेत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलक शिवसैनिकांकडून काळे झेंडे आणि भगवे झेंडे हातात घेत शायना एनसी यांचा निषेध करण्यात आला.

यावेळी शायना एनसी यांच्याविरोधात तीव्र संताप पाहायला मिळाला. भांडूपमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोस्टरबाजी, काळे झेंडे आणि घोषणाबाजीने भांडूपमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनीही परखड शब्दात शायना एनसी यांचा निषेध केला आहे.

काय म्हणाले सुनील राऊत?

“शायना एनसी यांना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडताना देशाने पाहिले ती हसली,तिला शरम वाटली नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडून देशात जाणूनबुजून कॉन्ट्रोवर्सी निर्माण केली. खून करून माफी मागितल्यावर आपण त्यांना माफ करतो का ? सजा देतो ना. त्याचप्रमाणे शायना एनसी यांच्याविरोधात एफआयआर करुन तिला तात्काळ अटक करायला हवे. मात्र एकनाथ शिंदे डरपोक आहेत, त्यांचे बाळासाहेबावर प्रेम नाही, ते शायनावर कारवाई करणार नाहीत” असं आमदार सुनील राऊत म्हणालेत.

Follow Us
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज