AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे स्थानकांवर पिवळ्या पाटीच्या खाली समुद्र सपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते, या मागे हे आहे महत्वाचे कारण ?

रेल्वे स्थानकाच्या पाटीखाली लिहिलेली एक माहिती तुम्ही कधी पाहिली आहे का ? ही आकडेवारी समुद्रसपाटीपासूनची या स्थानकाची उंची दर्शवते. प्रवाशांना ही माहिती सामान्य वाटत असली तरी हा आकडा खूपच उपयुक्त असतो.

रेल्वे स्थानकांवर पिवळ्या पाटीच्या खाली समुद्र सपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते, या मागे हे आहे महत्वाचे कारण ?
station name board
| Updated on: Nov 19, 2026 | 7:28 PM
Share

रेल्वे स्थानकावर नावाची पाटी असलेल्या सिमेंटच्या फलकावर नेहमी समुद्र सपाटीपासूनचे अंतर का लिहिलेले असते हे तुम्हाला माहिती आहे. सर्वसामान्य नागरिकांना ही माहिती का दिलेली असते हे नीट माहिती नसते. मात्र, याचा वापर तांत्रिक आणि सर्वेक्षणाशी जोडलेल्या कामात होते. जमीनीपासूनची उंची मोजण्यासाठी एक सर्वसमावेश बिंदू हवा असतो. त्यामुळे जगभरात सरासरी समुद्र सपाटीचा आधार मानला गेला आहे. कारण समुद्राचा पृष्टभाग जवळपास सर्वत्र सारखाच असतो. तर जमीनीची उंची कमी अधिक असू शकते. त्यामुळे स्थानकांचे स्थान समुद्र सपाटीपासून नेमके किती उंचीवर असते हे समजते. त्यामुळे वेगवेगल्या भागाच्या उंचीची तुलना करणे सोपे होते.

समुद्र सपाटीची उंची का महत्वाची?

सर्वेक्षणाचे काम करण्याआधी जमीनीची उंची मोजण्यासाठी आधारभूत बिंदूची गरज पडते, ज्यांना बेंचमार्क म्हटले जाते. स्टेशनची इमारत आणि प्लॅटफॉर्म स्थायी स्वरुपात असतात. त्यामुळे त्यांना उभारण्याआधी समुद्राच्या पृष्ठभागाची उंची समजणे महत्वाचे असते. त्यामुळे कोणतेही बांधकाम आणि नवीन रेल्वे मार्ग उभारताना सर्वे करणारे पुन्हा मोजणी करताना समुद्र सपाटीची उंची महत्वाची ठरते.

रेल्वे मार्ग टाकताना पटरीचा चढ आणि उताराचा हिशेब ठेवणे गरजेचे असते. ट्रेनला जास्त चढावर चालवणे कठीण आणि खर्चाची बाब असते. यासाठी मार्गिकेची उंची आणि खोलीचा नकाशा आधीपासूनच तयार केला जातो. दोन स्थानकांची उंचीचे अंतर सांगते की मधल्या मार्गात एकूण किती चढ आणि उतरण आहे.याच आधारावर इंजिनची शक्ती, डब्याची संख्या आणि ब्रेकिंगची योजना बनवली जाते.

स्टेशन आणि रुळांच्या आसपास पाण्याच्या बाहेर पडण्याची व्यवस्था उंचीच्या हिशेबाने तयार केली जाते. पाणी नेहमी उंचीकडून सखल भागात वाहते. त्यामुळे नाले, पाणी बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करताना आसपासची जमीनीची उंची माहिती असणे गरजेचे असते. पुर वा अतिवृष्टीच्या वेळी ही माहिती कामी येते. कारण पाण्याच्या पातळीचा स्तर निश्चित उंचीपर्यंत पोहचल्यानंतर कोणता भाग बुडू शकतो. याचा अंदाज लावले सोपे असते.

हवामान आणि उपकरणांसाठी

उंची वाढल्याने हवेचा दाब आणि घनता कमी होते. हवामानाची माहिती अचूकपणे वाचण्यासाठी आणि नोंदवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवाय, तज्ञांच्या मते, अति उंचीवरील विरळ हवेचा इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे डोंगराळ भागात रेल्वे मार्गांचे नियोजन करताना उंचीचा विचार केला जातो.

प्रवाशांसाठी सामान्य माहिती

हा आकडा प्रवाशांसाठीही मनोरंजक आहे. यावरून एखादे स्थानक मैदानी प्रदेशात आहे की डोंगराळ भागात, हे देखील कळते. शिमला, दार्जिलिंग किंवा ऊटीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी हा फलक तुम्हाला त्या भागाच्या समुद्रापासूनच्या स्थानकाच्या उंचीची कल्पना देऊ शकतो.

फलक सहसा स्थानकावरील एक निश्चित बिंदू दर्शवतो, जसे की प्लॅटफॉर्म किंवा ट्रॅकची पातळी. मोजमापाच्या वेगवेगळ्या पद्धती आणि संदर्भ बिंदूंमुळे हे मूल्य प्रत्येक स्रोतानुसार थोडे वेगळे असू शकते. अचूक तांत्रिक कामासाठी, रेल्वे किंवा सर्वेक्षण विभागाच्या अधिकृत नोंदी तपासल्या जातात.

Follow Us
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज