कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला अर्पण करा ‘या’ 5 वस्तू, पूर्ण होतील मनातील सर्व इच्छा
Kartiki Ekadashi 2026: कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळशी मातेला काही विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते, अशी धार्मिक मान्यता आहे. जाणून घ्या, कोणत्या ५ वस्तू तुळशी मातेला अर्पण कराव्यात.

हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून चातुर्मासाची समाप्ती होते आणि विवाहासह इतर शुभ कार्यांना सुरुवात होते, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा २० नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. ही प्रबोधिनी किंवा देवउठनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी माता आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह लावण्याची परंपराही आहे. तुळशी मातेला लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे या दिवशी तुळशीची पूजा करून तिला काही खास वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. जाणून घेऊया, या दिवशी तुळशी मातेला कोणत्या ५ वस्तू अर्पण कराव्यात.
लाल रंगाची ओढणी
कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला लाल रंगाची ओढणी अर्पण करावी. पूजेच्या वेळी तुळशीला लाल ओढणी नेसवणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि धन-वैभवात वाढ होते.
पिवळ्या रंगाचा धागा
या दिवशी तुळशीच्या रोपाला पिवळ्या रंगाचा धागा बांधण्याचीही परंपरा आहे. या धाग्याला ११ गाठी मारून तो तुळशीच्या रोपाला बांधावा आणि घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करावी. पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय असल्याने हा उपाय शुभ मानला जातो. यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
लाल कलावा
तुळशी मातेला लाल रंगाचा कलावा किंवा मोळीचा धागा बांधणेही शुभ मानले जाते. कलावा हा संरक्षण, मंगलता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीला लाल मोळीचा धागा बांधल्याने घरात सुख-शांती टिकून राहते आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.
कच्चे दूध
कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला गायीचे कच्चे दूध अर्पण करावे, असे सांगितले जाते. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिची कृपा प्राप्त होते, अशी मान्यता आहे. दूध अर्पण केल्यानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून आरती करावी.
खिरीचा नैवेद्य
या दिवशी तुळशी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवणेही शुभ मानले जाते. खिरीचा नैवेद्य अर्पण केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील आर्थिक समस्या दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र, कार्तिकी एकादशीला तुळशीची पाने तोडणे टाळावे. नैवेद्यासाठी आधीच तोडून ठेवलेली किंवा जमिनीवर पडलेली तुळशीची पाने वापरावीत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
