AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Share: थेट बँडबाजा आणि तुफान डान्स; नवरत्न कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, डिव्हिडंडही मिळणार

Multibagger Share: या नवरत्न कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनी मोठा फायदा झाला आहे. कंपनीला 224 कोटींचा नफा झाला आहे. तर कंपनीने आता गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडची घोषणा केली आहे. कोणती आहे ही कंपनी?

Multibagger Share: थेट बँडबाजा आणि तुफान डान्स; नवरत्न कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, डिव्हिडंडही मिळणार
एसजीव्हीएन मल्टिबॅगर शेअरImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 12, 2026 | 3:52 PM
Share

SJVN Multibagger Share: नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN) शेअरमध्ये बुधवारी तुफान आले. एसजेव्हीएन लिमिटेडचा शेअर बुधवारी BSE वर 6 टक्क्यांनी वधारला. हा शेअर या उसळीनंतर 77.29 रुपयांवर काल बंद झाला. तर आज बाजार बंद होण्यापूर्वी सुद्धा शेअरमध्ये उसळी दिसली. हा शेअर आज 1.14 टक्क्यांच्या तेजीसह 78.26 रुपयांवर व्यापार करत होता. चालू आर्थिक वर्षात डिसेंबरच्या तिमाहीमध्ये एसजेवीएन लिमिटेडचा फायदा 50 टक्क्यांनी अधिक वाढला. नवरत्न कंपनीने शेअरधारकांना डिव्हिडंड, लाभांश देण्याची घोषणा केली आहे. एसजेव्हीएनचे शेअर 52 आठवड्याच्या उच्चांकावर 107.50 रुपयांवर होते. कंपनीचा शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 68.17 रुपये आहे.

नवरत्न कंपनीला 224 कोटींचा नफा

नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडला चालू आर्थिक वर्षात, डिसेंबर तिमाहीत मोठा फायदा झाला. नफा 50.6 टक्क्यांनी वाढून 224.4 कोटी रुपये झाला. एका समान वर्षाच्या कालावधीत कंपनीला 149 कोटींचा नफा झाला. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत एसजेव्हीएन लिमिटेडचा (SJVN Limited) महसूल वार्षिक आधारावर 61.3 टक्क्यांनी वाढला. तिसर्‍या तिमाहीत कंपनीचा महसूल 1082 कोटी रुपये होता. एका वर्षांपूर्वीच्या समान कालावधीत कंपनीचा महसूल 671 कोटी रुपये होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2025 च्या तिमाहीत एसजेव्हीएनचा इबिट्डा 57 टक्क्यांनी वाढून 738 कोटी रुपयांवर पोहचला. एक वर्षांपूर्वी समान कालावधीत कंपनीचा महसूल 470 कोटी रुपये होता.

गुंतवणूकदारांना मिळणार लाभांश

नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Limited) बोर्डाने आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रत्येक शेअरवर 1.15 रुपयांचा डिव्हिडिंड, लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने अंतरिम लाभांश देण्याची रेकॉर्ड डेट 20 फेब्रुवाारी 2026 निश्चित केली आहे. याशिवाय एसजीव्हीएन लिमिटेडच्या बोर्डाने बाजारातून 1000 कोटींचा निधी जमावण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीने हा फंड अनसिक्योर्ड, रेटेड, टॅक्सेबल, रिडीमएबल, नॉन-कन्वर्टिबल, नॉन-कम्युलेटिव डिबेंचर्स यामाध्यमातून जमा करण्याचे ठरवले आहे.

SJVN Limited च्या शेअरमध्ये तुफान

SJVN Limited च्या शेअरमध्ये तुफान आले आहे. गेल्या 5 वर्षात कंपनीने 182 टक्क्यांहून अधिकची घोडदौड केली आहे. नवरत्न कंपनीचा शेअर 12 फेब्रुवारी 2021 रोजी 27.35 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर आज गुरुवारी 12 फेब्रुवारी 2026 रोजी 78.26 रुपयांवर होता. गेल्या पाच वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 186.67 टक्क्यांचा मोठा परतावा दिला आहे. तर एका वर्षाचा विचार करता कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची घसरण दिसली. गेल्या 6 महिन्यात कंपनीचा शेअर 17 टक्क्यांनी घसरला. तर या वर्षाचा विचार करता हा शेअर 3.43 टक्क्यांनी उसळला आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत