AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market: कमाईचे तुफान, 34 व्या वेळा डिव्हिडंड, 14 फेब्रुवारीपूर्वीच गुंतवणूकदारांना व्हॅलेंटाईन गिफ्ट

Share Market Dividend: केपीआर मिल लिमिटेड कंपनीने कमाल केली आहे. ही कंपनी आता 34 व्या वेळी लाभांश देण्याची घोषणा केली आहे. 14 फेब्रुवारी पूर्वी गुंतवणूकदारांना ही कंपनी व्हॅलेंटाईन गिफ्ट देणार आहे. काय आहे मोठी अपडेट?

Share Market: कमाईचे तुफान, 34 व्या वेळा डिव्हिडंड, 14 फेब्रुवारीपूर्वीच गुंतवणूकदारांना व्हॅलेंटाईन गिफ्ट
कंपनीची कमाल, पुन्हा डिव्हिडिंडचे गिफ्टImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 10, 2026 | 3:45 PM
Share

Share Market Dividend: KPR Mill ही कंपनी पुन्हा एकदा लाभांश देण्याच्या तयारीत आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला याविषयीची माहिती दिली आहे. या डिव्हिडंडसाठी कंपनीने रेकॉर्ड डेटची घोषणा केली आहे. ही कंपनी आता 34 व्या वेळी लाभांश देण्याची घोषणा केली आहे. 14 फेब्रुवारी पूर्वी गुंतवणूकदारांना ही कंपनी व्हॅलेंटाईन गिफ्ट देणार आहे. यापूर्वी कंपनीने 33 वेळा लाभांश देण्याचा विक्रम केला आहे. काय आहे मोठी अपडेट?

गुंतवणूकदारांना किती लाभांश?

स्टॉक एक्सचेंजला कंपनीने माहिती दिली आहे. त्यानुसार केपीआर मिल लिमिटडेने एक रुपया फेसव्हॅल्यूच्या एका शेअरवर 2.50 रुपयांचा लाभांश दिला आहे. या डिव्हिडंडसाठी कंपनीने 13 फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आले आहे. KPR Mill ने गुंतवणूकदारांनी पहिल्यांदा 2007 मध्ये लाभांश दिला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर दोन रुपयांचा डिव्हिडंड दिला होता. यापूर्वी शेवटी कंपनीने 2025 मध्ये एक्स डिव्हिडंड ट्रेड केला होता. तेव्हा पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 2.50 रुपयांचा फायदा झाला होता.

कंपनीची आर्थिक परिस्थिती कशी?

केपीआर मिलने तिमाही निकालांची घोषणा केली आहे. कंपनीने माहिती दिल्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण निव्वळ नफा 208.60 कोटी रुपये होता. एका वर्षांपूर्वी याच तिमाहीत कंपनली नेट प्रॉफिट 202.25 कोटी रुपये राहिले. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट 218.03 कोटी रुपये होता. तिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी घसरण झाली.

शेअर बाजारात सोमवारी केपीआर मिलचा शेअर 0.33 टक्क्यांच्या तेजीसह बीएसईमध्ये 980.25 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 10 टक्क्यांची तेजी दिसून आली. या दरम्यान सेन्सेक्स इंडेक्समध्ये 7.97 टक्क्यांची उसळी दिसून आली. गेल्या पाच वर्षात कंपनीच्या शेअरचा भाव 421 टक्क्यांनी वधारला आहे. आता 34 व्या वेळा कंपनी गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून देण्याच्या तयारीत आहे. जुन्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा दिसून येत आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत