AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market चे धुरंधर! 6 दिवसात 76 टक्क्यांचा तुफान परतावा, गुंतवणूकदारांनी गोण्या भरून आणला पैसा

Multibagger Stock:भारत-अमेरिका व्यापारी करारा झाल्यापासून काही शेअर्सला भरते आले आहेत. बड्या कंपन्यांसह इतर कंपन्यांचे सुगीचे दिवस आले आहेत. या स्टॉकने गुंतवणूकदारांना 76% पर्यंत दमदार रिटर्न दिला आहे.

Share Market चे धुरंधर! 6 दिवसात 76 टक्क्यांचा तुफान परतावा, गुंतवणूकदारांनी गोण्या भरून आणला पैसा
मल्टिबॅगर स्टॉकImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 3:34 PM
Share

Multibagger Stock: गेला व्यापारी आठवडा हा सहा दिवसांचा होता. रविवारी 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर करण्यात आले. त्यादिवशी शेअर बाजार उघडला होता. गेल्या आठवड्यात BSE सेन्सेक्स 1,310.62 अंक वा 1.59 टक्क्यांनी वाढून 83,580.40 वर बंद झाला. तर निफ्टी50, 373.05 अंक वा 1.47 टक्क्यांनी वधारून 25,693.70 वर पोहचला. तर या काळात या शेअर्सने कमाल दाखवली. गुंतवणूकदार, ट्रेडर्सला 6 दिवसात 76% पर्यंतचा परतावा मिळाला. त्यांना या दिवसात या पेनी आणि मल्टिबॅगर शेअरने दणकावून परतावा दिला. ज्यांच्या पोर्टफोलिओत हे स्टॉक आहेत. त्यांना या सहा दिवसात या सहा स्टॉकची झेप लक्षात आली. शेअर बाजारातील अनुकूल वातावरणाचाही फायदा मिळाला.

Genus Prime Infra Share Price

जीनस प्राईम इन्फ्रा शेअर या यादीत आघाडीवर आहे. या शेअरने आठवड्यात 76.40 टक्क्यांचा परतावा दिला. हा शेअर या कालावधीत 18.22 रुपयांहून 32.14 रुपयांवर पोहचला. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर 2.92 रुपये वा 9.99 टक्क्यांनी उसळून 32.14 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 47.97 कोटी रुपये आहे.

Stratmont Industries Share Price

स्टॅटमोंट इंडस्ट्रीजचा शेअर गेल्या आठवड्यात 61.11 टक्क्यांनी उसळला. हा शेअर 55.87 रुपयांहून 90.01 रुपयांवर पोहचला. शुक्रवारी बीएसई कंपनीचा शेअर 15 रुपये वा 20 टक्के उसळून 90.01 रुपयांवर बंद झाला. या कंपनीचे बाजार भांडवल 256.51 कोटी रुपये आहे.

Tijaria Polypipes Share Price

तिजारिया पॉलीपाईप्सचा शेअर 4.24 रुपयांहून 6.76 रुपयांवर पोहचला. गुंतवणूकदारांना 59.43 टक्क्यांचा परतावा मिळाला. शुक्रवारी बीएसईवर हा शेअर 0.40 रुपये वा 6.29 टक्क्यांनी उसळून 6.76 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 19.27 कोटी रुपये आहे.

Loyal Textile Mills Share Price

लॉयल टेक्सटाईल्सचा शेअर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या व्यापारी आठवड्यात या शेअरने 58.30 टक्क्यांचा परतावा दिला. हा शेअर 192.55 रुपयांहून 304.80 रुपयांवर पोहचला. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर 50.80 रुपये वा 20 टक्क्यांनी उसळून 304.80 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅपिटल 150.67 कोटी रुपये आहे.

TTI Enterprise Share Price

टीटीआय इंटरप्राईज या यादीत सर्वात शेवटी आहे. या शेअरने गेल्या आठवड्यात 52.83 टक्क्यांचा परतावा दिला. हा शेअर 6.36 रुपयांहून 9.72 रुपयांवर पोहचला. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर 0.11 रुपये वा 1.14 टक्क्यांनी उसळून 9.72 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजार भांडवल 24.69 कोटी रुपये आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.