AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : सुनेत्रा ताईंनी शरद पवारांना फोन केला की नाही हे मला माहित नाही, पण..छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Chhagan Bhujbal : तुमच्या पक्षाकडून शरद पवारांच्या पक्षाला काही प्रस्ताव दिला जाणार आहे का? "या हायपोथिटीकल प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नाही. हे असं झालं तर तसं झालं तर.." असं छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal : सुनेत्रा ताईंनी शरद पवारांना फोन केला की नाही हे मला माहित नाही, पण..छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Chhagan Bhujbal
| Updated on: Feb 14, 2026 | 1:43 PM
Share

“मला हे कळत नाही रोज विलिनीकरण, विलिनीकरण काय ही चर्चा आहे. विलिनीकरण आजही करता येईल. एक महिन्याने, दोन महिन्याने करता येईल. घाई करण्याचं कारण काय आहे?. सुनेत्रा पवार तिथे उपमुख्यमंत्री म्हणून बसलेल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्यानंतर पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत तसचं त्यांना वाटेल त्या नेत्यांना त्या बोलावतील. चर्चा होईल, एवढा मोठा निर्णय आहे. हा दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा करुन होईल. त्या बद्दल इतकी घाई करण्याचं कारण नाही. आता ते ठरल होतं, हे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन आल्या आहेत. त्यांना बसू द्या, काम करुन द्या. समजून घेऊ द्या. मग बघतील काय करायचे ते” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते छगन भुजबळ विलिनीकरणांच्या चर्चांवर म्हणाले.

“त्यांनी त्या पदावर व्यवस्थित स्थिरस्थावर होणं. त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड होणं हा माझ्यासमोरचा प्राथमिक अजेंडा आहे” असं छगन भुजबळ म्हणाले. आपल्या पक्षातले आमदार विलिनीकरणाबद्दल मत व्यक्त करतायत, त्यावर “हे मोघमपणे बोलण्यात काही अर्थ नाही. नवीन कॅप्टन नेमलेत ते विचार करतील. मग बघू काय करायचं ते” असं छगन भुजबळ म्हणाले. “तीन-चार दिवसात शपथ घेतल्यानंतर घाई केली. मग, पहिल्या दिवसापासून विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे, ती घाई नाही का? रोज तीच,तीच बातमी” असं छगन भुजबळ म्हणाले.

ते सगळे बसून विचार करतील

खोसकर, झिरवळ दिल्लीला गेलेत. त्यावर “दिल्लीत मोदी, अमितभाईंना भेटायला गेलेत का?. मला माहिती नाही. त्यांच्या खात्याचं काही काम असेल म्हणून गेले असतील” “पक्ष संघटना म्हणजे काय? सगळे मिळून संघटना तयार होते, पक्ष बनतो. पक्ष म्हणजे बोर्ड आहे का? ऑफिस आहे का?. तिथे काम करणारे कार्यकर्ते मिळून संघटना, पक्ष तयार होतो. ते सगळे बसून विचार करतील” असं छगन भुजबळ म्हणाले.

शरद पवारांना फोन

सुनेत्रा ताईंनी शपथ विधी आधी शरद पवारांना फोन केला होता, अशी माहिती समोर येतेय. “फोन केला होता की नाही मला माहित नाही. पण जय, पार्थ तिथे जाऊन पवार कुटुंबियांना भेटून आले. ते सर्व टीव्हीवर चाललेलं ना हे आपण पाहिलं”

Follow Us
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...