SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात…
निवडणूक आयोगाने SIR प्रक्रियेवर स्पष्टीकरण दिले असून, दावे आणि आक्षेपांसाठी मुदतवाढ दिली आहे. आयोगाने कॅबिनेट सचिवांना पाठवलेल्या पत्राविषयीचे मतभेद संवादातून मिटवले असल्याचे म्हटले. मतदार नोंदणीसाठी फॉर्म-६ आणि SIR प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळाली आहे. आयोगाने सर्व निर्णय एकमताने घेतल्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) SIR प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण दिले असून, मतदार यादीतील नावे वगळण्याबाबतचे दावे आणि आक्षेप दाखल करण्याची मुदत वाढवली आहे. राज्यात १२ ऑक्टोबरपर्यंत तर दिल्लीत ३० ऑक्टोबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. कॅबिनेट सचिवांना पाठवलेले पत्र धोरणात्मक विषयाशी संबंधित नव्हते, तर प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कामकाजासंदर्भात होते, असे आयोगाने स्पष्ट केले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानंतर निवडणूक आयोगाने निवेदन दिले असून, दोन आयुक्तांनी व्यक्त केलेले मतभेद संवादातून मिटवल्याचा अप्रत्यक्षपणे दावा केला आहे.
आयोगाच्या प्रत्येक बैठकीचा अजेंडा आधीच दिला जाईल आणि बैठकीचे इतिवृत्तही दिले जाईल, असे आयोगाने नमूद केले. कालच्या बैठकीत घेतलेले सर्व निर्णय तिन्ही आयुक्तांनी सहमतीने घेतल्याचा निवेदनात उल्लेख आहे. आयटी विभागाच्या महासंचालक सीमा खन्ना यांच्याकडे सर्व अधिकारांचे केंद्रीकरण झाल्याचा आरोपही फेटाळण्यात आला. SIR चा निर्णय २४ जून २०२५ रोजी आयोगाने एकमताने घेतला होता आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. नव्या मतदार नोंदणीच्या फॉर्म-६ चे आयोगाच्या निवेदनात पूर्ण समर्थन करण्यात आले आहे.
Published on: Sep 27, 2026 10:46 AM
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर

