AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप

मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप

| Updated on: Sep 27, 2026 | 8:26 AM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला फसवल्याचा आरोप आंदोलनातील सक्रिय सदस्या ललित तारख यांनी केला आहे. अंतरवली सराटी गावात एकही कुणबी नोंद न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. भावनिक आवाहनाद्वारे माता-माऊलींना फसवल्याचा दावा तारख यांनी केला, आंदोलनात सक्रिय असूनही त्यांना कोणताही फायदा झाला नाही.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून एक धक्कादायक दावा समोर आला आहे. आंदोलनात सक्रिय असलेल्या ललित तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंनी आम्हाला फसवले, अंतरवली सराटीत एक तरी कुणबी नोंद मिळाली का? असा सवाल करत तारख यांनी जरांगेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तारख यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आणि इतर महिलांनी दिवसरात्र आंदोलनासाठी कष्ट घेतले. चहापाणी, अन्नदान यासारखी कामे केली, परंतु या आंदोलनातून त्यांना कोणताही वैयक्तिक फायदा झाला नाही.

विशेषतः, त्यांच्या अंतरवली सराटी गावातून एकाही व्यक्तीला कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. ललित तारख यांनी स्वतः १० महिन्यांपूर्वी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केला असून, त्यांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही. या संदर्भात जरांगे पाटलांनी उत्तर द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी आरोप केला आहे की, जरांगे पाटलांनी गावातील माता-माऊलींना खोटे आश्वासन देऊन आणि भावनिक करून फसवले आहे. जरांगे पाटलांनी उपोषण कसे केले, हे योग्य वेळी उघड करणार असल्याचे संकेतही तारख यांनी दिले आहेत.

Published on: Sep 27, 2026 08:26 AM

Follow Us