AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahayuti Govt : तुमच्या पदाची मला लाज वाटली, महायुतीचे दोन आमदार भिडले, जोरदार वादावादी

Mahayuti Govt : सत्ताधारी महायुतीच्या दोन आमदारांमध्ये विसंवाद निर्माण झाला आहे. तीव्र स्वरुपाचे मतभेद समोर आले आहेत. महायुतीच्या दोन्ही आमदारांमध्ये जोरदार वाद पेटलाय. लाज काढण्यापर्यंत हे प्रकरण गेलय.

Mahayuti Govt : तुमच्या पदाची मला लाज वाटली, महायुतीचे दोन आमदार भिडले, जोरदार वादावादी
Prashant Bamb
| Updated on: Sep 27, 2026 | 10:27 AM
Share

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या दोन सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपली आहे. शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यावरून भाजप आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण आमने-सामने आले आहेत. महायुतीच्या दोन्ही आमदारांमध्ये जोरदार वाद पेटलाय. एकमेकांना पत्र पाठवून लाज काढण्यापर्यंत हे प्रकरण गेल्यानं वाद अधिकच विकोपाला जाण्याची शक्यता दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 1086 शिक्षकांची वेतनवाढ रोखल्याच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्यात जोरदार राजकीय वाद पेटला आहे.

आमदार सतीश चव्हाण यांनी पत्राद्वारे उपस्थित केलेल्या आक्षेपांवर आमदार बंब यांनी 8 पानांचे पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. शिक्षकांनी मुख्यालयी राहणे हा त्यांचा घटनात्मक व सेवाशर्तींचा भाग असून, 70 टक्के शिक्षक खोटी कागदपत्रे सादर करून अप-डाऊन करतात आणि गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप आमदार बंब यांनी केला आहे. तसेच, दर्जेदार शिक्षण न देणाऱ्या शिक्षकांची लाचारी पत्करून सतीश चव्हाण हे स्वतःच्या शिक्षण संस्था जपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असून हे कृत्य देशद्रोहासारखेच आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

मोठं प्रेमपत्र त्यांनी दिलंय

आमदार सतीश चव्हाण यांनी आपल्या 18 वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळाची श्वेतपत्रिका काढावी किंवा जनतेची माफी मागावी, असे आव्हानही बंब यांनी दिल्याने मराठवाड्यात शैक्षणिक व राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दर्जेदार शिक्षण न देणाऱ्या शिक्षकांची लाचारी पत्करुन स्वतःच्या संस्था जपण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून तुमच्या पदाची मला पुन्हा लाज वाटली असल्याचं पत्र आमदार बंब आणि आमदार सतीश चव्हाण यांना पाठवलं आहे. त्यावर आमदार सतीश चव्हाण यांनी मोठं प्रेमपत्र त्यांनी दिलंय, वाचल्यानंतर मी प्रतिक्रिया देतो असं सांगितलं.

Follow Us
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात