AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nikhil Gupta : मैत्री मागचा अमेरिकेचा खरा चेहरा उघड, एका दहशतवाद्याला वाचवण्यासाठी भारताला दिला मोठा झटका

Nikhil Gupta : भारत-अमेरिका संबंध पुन्हा बिघडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. अमेरिका निखिल गुप्ता यांच्या कबूलनाम्याचा शस्त्रासारखा वापर करु शकते. एका दहशतवाद्याला वाचवण्यासाठी अमेरिका हे सर्व करतेय.

Nikhil Gupta : मैत्री मागचा अमेरिकेचा खरा चेहरा उघड, एका दहशतवाद्याला वाचवण्यासाठी भारताला दिला मोठा झटका
Trump-Pannu- Nikhil Gupta
| Updated on: Feb 14, 2026 | 11:46 AM
Share

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूचा हत्येचा कट रचण्याच्या प्रकरणात कोर्टाचा निर्णय आलाय. या प्रकरणात भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांना 24 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान निखिल यांनी कोर्टात आपला गुन्हा कबूल केला. कोर्टाच्या या निर्णयानंतर भारत-अमेरिका संबंध पुन्हा बिघडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. अमेरिका निखिल गुप्ता यांच्या कबूलनाम्याचा शस्त्रासारखा वापर करु शकते. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटावरुन याआधीच भारत-अमेरिकेमध्ये मतभेद आहेत. बऱ्याच काळानंतर भारत-अमेरिका संबंध ट्रॅकवर येत आहेत. निखिल गुप्ताने तत्कालीन भारतीय सुरक्षा अधिकारी विकास यादव यांच्या निर्देशावरुन हा कट रचला होता.

अमेरिकी कोर्टात निखिल गुप्ता यांच्या कबूलनाम्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक नवीन वळण लागलय. त्यामुळे अमेरिकेच्या कारवाईवर भारताची नजर असेल. अमेरिकेत वाँटेड असलेल्या विकास यादवला दिल्ली पोलिसांनी 18 डिसेंबर 2023 रोजी अटक केली होती. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा FBI कडून विकास यादवचा फोटो रिलीज करण्यात आला होता. FBI चं म्हणणं आहे की, विकास यादवच्या सांगण्यावरुन निखिल गुप्ताने पन्नूच्या हत्येचा कट रचला होता.

वेळीच हा कट रोखण्यात आला

अमेरिकी तपास संस्था FBI ने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिका त्यांच्या नागरिकांचं नुकसान करणाऱ्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही असं एफबीआय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. वेळीच हा कट रोखण्यात आला. त्यामुळे कारस्थानं यशस्वी होऊ शकलं नाही असं अमेरिकी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

अमेरिकेकडे कधी केलं प्रत्यर्पण?

अमेरिकेचा आरोप आहे की, एका भारतीय नागरिकाने अमेरिकेत राहणार्‍या शीख नेत्याच्या हत्येचा प्रयत्न केला. अमेरिकी तपास संस्थांना आधीच याची माहिती मिळाली होती. त्यांनी प्लान अयशस्वी केला. आरोपीने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला. पन्नूच्या हत्येचं कारस्थान रचल्याच्या आरोपाखाली निखिल गुप्ताला 30 जून 2023 रोजी चेक रिपब्लिक येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 14 जून 2024 रोजी निखिलचं अमेरिकेकडे प्रत्यर्पण करण्यात आलं.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात