tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीत विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शशिकांत शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखातून विलिनीकरणाचा मुद्दा पुनरुच्चारित केला आहे. शिंदे यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे की, 12 तारखेलाच विलिनीकरण होऊन पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्याचे ठरले होते, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र अदृश्य शक्तींच्या कारवाया आणि धमक्यांमुळे अजित पवारांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखातून विलिनीकरणाचा मुद्दा पुनरुच्चारित केला आहे. शिंदे यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे की, 12 तारखेलाच विलिनीकरण होऊन पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्याचे ठरले होते, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र अदृश्य शक्तींच्या कारवाया आणि धमक्यांमुळे अजित पवारांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करावा लागला, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला आहे. झालेली चूक दुरुस्त करण्याच्या उद्देशाने अजित पवार गेल्या चार ते पाच महिन्यांपासून प्रयत्नशील असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. पक्षाचे विलीनीकरण करून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा मजबुतीने उभे करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, या लेखावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. विलिनीकरणाचा निर्णय घेण्यामध्ये मुख्य भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीची असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोणताही प्रस्ताव आल्यास प्रथम पक्षांतर्गत चर्चा केली जाईल, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही तटकरे यांनी सांगितले. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये मतभेद उघड होत असून, आगामी काळात या घडामोडींना कोणते वळण मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Published on: Feb 14, 2026 11:20 AM
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या

