AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय खेळाडू पुन्हा एकदा पाकिस्तानची लाज काढणार, नाणेफेक होताच…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण पहिल्यांदा पाकिस्तानने खेळण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर खेळण्याची तयारी केली. असं असताना टीम इंडिया पुन्हा एकदा लाज काढणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय खेळाडू पुन्हा एकदा पाकिस्तानची लाज काढणार, नाणेफेक होताच...
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय खेळाडू पुन्हा एकदा पाकिस्तानची लाज काढणार, नाणेफेक होताच...Image Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 14, 2026 | 4:59 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना होणार की नाही याबाबत आधी साशंकता होती. कारण पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर यूटर्न घेतला आणि खेळण्याची तयारी दर्शवली. दुसरीकडे, भारतीय संघाचा पवित्रा मात्र कायम आहे. पाकिस्तानने खेळावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मैदानात जाणार असं कर्णधार सूर्यकुमार यादव तेव्हाच म्हणाला होता. आता सर्व प्रकरण शांत झालं असून सामना होत आहे. पण नाणेफेकीवेळी हस्तांदोलन होईल की नाही याबाबत साशंकता आहे आहे. कारण पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानसोबत नो हँडशेक पॉलिसीचा अवलंब केला आहे. आशिया कप स्पर्धेत एकदा नाही तर तीनदा हा‍तमिळवणीस नकार दिला. त्यानंतर इतर खेळात आणि फॉर्मेटमध्ये हा कित्ती गिरवला गेला. आता आयसीसी स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे हस्तांदोलनाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याला हस्तांदोलनाबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने सांगितलं की, हा सामना योग्य भावनेने खेळला पाहिजे. त्यांनी आग्रह केला तर पाकिस्तान पारंपारिक हस्तांदोलनासाठी तयार आहे. पण निर्णय भारतीय खेळाडूंवर अवलंबून असेल. “क्रिकेट हे खेळ भावनेने खेळले पाहिजे. माझे वैयक्तिक मत महत्त्वाचे नसू शकते, परंतु क्रिकेट नेहमीप्रमाणेच खेळले पाहिजे. काय करायचे ते त्यांनी ठरवायचे आहे,” असं सलमान आघा म्हणाला.

आशिया कप स्पर्धेत हस्तांदोलन टाळल्याने पीसीबीने आशिया कप 2025 स्पर्धेवर बहिष्काराची वल्गना केली होती. शेवटी सामनाधिकारी पायक्राफ्टला काढून टाकण्याच्या अटीवर सामने खेळले. भारताने त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्या हातून आशिया कप ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानची आणखी लाज गेली. अजूनही भारताने मिळवलेली आशिया कप ट्रॉफी दुबईच्या कार्यालयात बंदिस्त आहे. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यातील विजयी संघ सुपर 8 फेरीत आपलं स्थान पक्कं करणार आहे.

Follow Us
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर; ज्ञानेश कुमारांच्या....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?