AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्रेनचा रशियावर सर्वात मोठा हल्ला! बघता बघता 822 ड्रोन…अचानक नेमकं काय घडलं?

दुसरीकडे रशियाने देखील युक्रेनच्या राजधानी कीव्हवर हल्ला केला आहे. रशिया जाणून बुजून आमच्या नागरिक ठिकाणांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे.

युक्रेनचा रशियावर सर्वात मोठा हल्ला! बघता बघता 822 ड्रोन...अचानक नेमकं काय घडलं?
zelensky and putin
| Updated on: Aug 16, 2026 | 11:21 PM
Share

युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्राणघातक हवाई हल्ला केला आहे. रविवारी रात्री केलेल्या या हल्ल्याने रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनने ड्रोनद्वारे रशियाची राजधानी मॉस्कोपासून रोस्तोवपर्यंत प्रचंड विध्वंस घडवला आहे. रशियाने आपण युक्रेनचे ८२२ ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. या भीषण हल्ल्यात रशियाचे किमान सहा जण ठार झाले आहेत.

मॉस्को आणि रोस्तोवमध्ये प्रचंड विध्वंस

युक्रेनचे अंदाजे ६०० ड्रोन थेट राजधानी मॉस्कोच्या दिशेने येत होते. यापैकी एक तृतीयांश ड्रोन मॉस्को शहराच्या परिसरातच हवेतच नष्ट करण्यात आल्याचे मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी म्हटले आहे. एक ड्रोन थेट एका निवासी इमारतीला धडकल्याने यात ८३ वर्षांच्या वृद्ध इसमाचा मृ्त्यू झाला असल्याचे मॉस्को प्रदेशाचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव यांनी सांगितले. या हल्ल्याने पोडॉल्स्क शहरातील ‘वाइल्डबेरीज’ या ई-कॉमर्स कंपनीच्या मोठ्या गोदामांना भीषण आग लागली आणि आकाशात काळ्या धुराचे लोट पसरल्याचे दूरपर्यंत दिसत होते.

दुसरीकडे, रशियाचा रोस्तोव्ह हा प्रदेशही हादरला. युक्रेनने 150 हून अधिक ड्रोनच्या मदतीने रोस्तोवच्या तीन शहरांवर हल्ला केला. येथे झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला. अनेक निवासी घरे, रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूचे जंगलांना या ड्रोन हल्ल्याने आग लागल्याचे गव्हर्नर युरी स्ल्युसर यांनी सांगितले.

रशियाने युक्रेनवर हल्ला केला का?

रशियानेही क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला आहे. रशियन क्षेपणास्त्र क्रिवी रिह शहरावर आदळल्याने दोन जण ठार तर १४ जण जखमी झाल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. सुमी शहरात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक ठिकाणी आग लागली असून त्यात सहा जण दगावले आहेत. रशिया जाणीवपूर्वक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या मदतीने युक्रेनच्या नागरी भागांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?