AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुम्ही देखील करतात का या चूका? सावधान पडू शकतात महागात, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करतो, ज्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे.

Vastu Shastra : तुम्ही देखील करतात का या चूका? सावधान पडू शकतात महागात, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 10:29 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व  आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात.  जसं की काही कारण नसताना अचानक घरात गृहकलह वाढतो, नवरा बायकोचं पटत नाही. अनेकदा आर्थिक अडचणी येतात, कर्ज वाढतं. या अशा अडचणी  का येतात? तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक ऊर्जेचं प्रमाण वाढल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे अशा चुका टाळायला पाहिजे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

घराच्या दरवाजाची उंची – वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची उंची ही कमी नसावी, या दरवाजामधून माणसांना सहज जाता येता आलं पाहिजे, अशी त्याची उंची असावी, कारण तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हाच ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असतो. याच दरवाजामधून घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.

झोपण्याची दिशा – वास्तुशास्त्रानुसार तुमची झोपण्याची दिशा ही नेहमी पूर्व- पश्चिम असावी, कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. उत्तरेला पाय आणि दक्षिणेला डोके करून झोपणे वास्तुशास्त्रामध्ये शुभ मानलं गेलं आहे.

देवघर – तुमचं देवघर हे नेहमी पूर्व दिशेला असावं, देवघरात कधीही एकाच देवाच्या दोन मूर्ती असू नये, जसं की दोन गणपतीच्या मूर्ती, दोन देवीच्या मूर्ती, किंवा इतर देवाच्या मूर्ती, देवघरात नेहमी एका देवाची एकच मूर्ती असावी, असंही वास्तुशास्त्र सांगतं.

तसेच बाथरूममध्ये देखील कधीही मोकळ्या बकेट ठेवू नयेत, बाथरूममध्ये नेहमी पाण्याने भरलेल्या बकेटच ठेवाव्यात, यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते, असा सल्ला देखील वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.  यासोबतच इतर अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी