AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात, HSC बोर्डाची तातडीची पत्रकार परिषद, केला मोठा बदल

HSC Exam Update : उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने तातडीची पत्रकार परिषद घेतली. बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी यात परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली.

उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात, HSC बोर्डाची तातडीची पत्रकार परिषद, केला मोठा बदल
HSC ExamImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 09, 2026 | 4:00 PM
Share

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. त्यामुळे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून अभ्यास करत आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान होणार आहे. तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या काळात इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे. अशातच आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने तातडीची पत्रकार परिषद घेतली. बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी यात परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली. नंदकुमार बेडसे यांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

15 लाख 32 हजार 487 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार

नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देणार आहेत. 3387 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. यातील 7 लाख 99 हजार 773 विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे असणार आहेत. तर 3,80,692 विद्यार्थी हे कला शाखेची परीक्षा देणार आहेत. तर 3,20,152 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत. किमान कौशल्य आणि आयटीआय टेक्निकल सायंन्सचेही काही विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समुपदेशक असणार

पुढे बोलताना नंदकुमार बेडसे यांनी म्हटले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आम्ही 3 फेब्रुवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले. यंदा आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन समुपदेशक नेमले आहेत. ते विद्यार्थ्यांना समुपदेशन करणार आहेत. बोर्ड स्तरावरही 10 समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वजण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करणार आहेत. काही पेपर सकाळी 11 वाजता आणि काही पेपर दुपारी 3 वाजता असणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे.

पेपर वाचण्यासाठीच्या वेळेबाबत मोठा निर्णय

विद्यार्थ्यांने त्यांचे हॉलतिकिट शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याआधी 11 वाजता पेपर सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटांचा वेळ प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येत होता. मात्र यंदा 11 वाजता पेपर सुरु झाल्यानंतर 10 मिनिटे पेपर वाचन करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे, परीक्षेच्या शेवटी हा वेळ जोडला जाणार आहे. हा यंदाच्या परीक्षेतील मोठा बदल असणार आहे. पेपर लीक होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना तासाला 20 मिनिटे लेखणीक देण्यात येणार आहेत. कॉपीचा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आलेली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?