AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...

ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट…

| Updated on: Aug 10, 2026 | 4:45 PM
Share

काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यामध्ये माजी खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश होता. त्यांच्या पक्षांतरानंतर त्यांच्या कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील या देखील पक्षप्रवेश करून ठाकरे गटाची साथ सोडतील का?

राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यामध्ये माजी खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश होता. त्यांच्या पक्षांतरानंतर त्यांच्या कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील या देखील पक्षप्रवेश करून ठाकरे गटाची साथ सोडतील का? अशा राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र त्यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

संजय दिना पाटील यांच्या कन्या आणि शिवसेना ठाकरे गटातील नगरसेविका राजुल पाटील या नुकत्याच शिंदे गटातील एका कार्यक्रमात उपस्थित होत्या. या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते, तर मध्यांतरी जोरदार चर्चेत असलेले विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनीदेखील हजेरी लावली आहे. यावर आता ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राजुल पाटील यांची कृती न पटल्याचं सांगिलं आहे. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, पक्षाने यावर ठोस भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे.

Published on: Aug 10, 2026 04:41 PM

Follow Us