AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Dombivli : भटक्या कुत्र्यांच्या नावाखाली अधिकारी भरतायेत स्वतःचे खिसे, नसबंदीबद्दल धक्कादायक माहिती समोर

कल्याण मधील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे. पण कल्याण-डोंबिवलीतल्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी काँग्रेसकडून धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

Kalyan Dombivli : भटक्या कुत्र्यांच्या नावाखाली अधिकारी भरतायेत स्वतःचे खिसे, नसबंदीबद्दल धक्कादायक माहिती समोर
| Updated on: Aug 11, 2026 | 9:18 AM
Share

कल्याण शहरात (Kalyan News) गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद घातला आहे. कल्याण स्टेशन परिसर आणि खडकपाडा परिसरात दोन दिवसात तब्बल 200 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. याप्रकरणी खडकपाडा येथील उच्छाद घालणाऱ्या कुत्र्याला जेरबंद करण्यात महापालिकेला यश मिळालं असून त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पण यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, धक्कादायक दावा केला आहे.

कल्याणमध्ये भटक्या श्वानांचा कहर पाहायला मिळत आहे. दोन दिवसात 200 हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चाव घेतला आहे. यावर काँग्रेस आक्रमक झाली असून नसबंदीवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भटक्या कुत्र्यांच्या नावाखाली अधिकारी भरतायेत स्वतःचे खिसे

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे शहरात भीतीचं वातावरण असताना, कांचन कुलकर्णी यांनी धक्कादायक दावा केला आहे. नसबंदीबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांची पोलखोल केली आहे. कुलकर्णी यांनी केलेल्या दाव्यानुसार, नसबंदीची खूण असलेली मादी श्वान गर्भवती असल्याचं त्यांनी सांगितलं. नसबंदी न करताच केवळ कागदोपत्री काम दाखवत बिल काढल्याचे गंभीर आरोप अधिकारी आणि ठेकेदारांवर करण्यात आले आहेत. ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून संबंधित अधिकारी-ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील काँग्रेसने केली आहे.

150 हून अधिक डॉग बाईटचे रुग्ण

कुत्र्यांच्या होणाऱ्या सततच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, एका दिवसांत वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये कुत्रा चावल्याने उपचारासाठी नागरिक पोहोचले. समोर येत असलेल्या आकड्यानुसार 48 रुग्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाले होते.

48 पैकी 46 रुग्णांना अँटी-रेबीज इंजेक्शन देऊन घरी सोडण्यात आलं. पण त्यामधील 2 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबई येथील सायन रुग्णालयात जाण्यास सांगितलं. तर अनेकांवर खासगी रुग्णालयांमध्ये देखील उपचार सुरु आहे. सांगायचं झालं तर, अनेक परिसर असे देखील जेथे एकाच जागी अनेक कुत्रे असतात. ज्यामुळे रस्त्यावरून चालताना देखील नागरिकांना भीती वाटते. एवढंच नाही तर, लहान मुलांमध्ये देखील भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने  योग्ये वेळेत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?