AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्यदिनी कोण करणार ध्वजारोहण? रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून पुन्हा जुंपणार? बड्या नेत्याची मोठी नाराजी

Raigad Guardian Minister: 15 ऑगस्ट आता तोंडावर आला आहे. तरीही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. भरतशेट गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यातील रस्सीखेच संपलेली नाही. यापूर्वी पालकमंत्री पद शिंदे सेनेला मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. पण अजूनही याविषयीची अधिकृत घोषणा न झाल्याने नाराजी नाट्य उभं राहिलं आहे.

स्वातंत्र्यदिनी कोण करणार ध्वजारोहण? रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून पुन्हा जुंपणार? बड्या नेत्याची मोठी नाराजी
भरत गोगावले, सुनील तटकरे, अदिती तटकरे
| Updated on: Aug 11, 2026 | 9:06 AM
Share

15 ऑगस्ट रोजी रायगडमध्ये स्वातंत्र्यदिनी कोण करणार ध्वजारोहण? हा कळीचा मुद्दा पुन्हा उभा ठाकला आहे. 2024 पासून रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा वाद तापलेला आहे. मध्यंतरी अनेकदा या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याचे संकेत भरतशेठ गोगावले यांनी दिले होते. पण अद्यापही अधिकृत घोषणा न झाल्याने आता नाराजी नाट्य समोर आले आहे. शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. यामुळे यावेळी ध्वजारोहण कुणाच्या हस्ते होणार याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. त्याची कार्यकर्त्यांना प्रतिक्षा लागली आहे.

ध्वजारोहण करणार कोण?

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार अथवा प्रजासत्ताक दिनी झेंडा कोण फडकवणार ही चर्चा गेल्या दोन वर्षात नित्याचीच झाली आहे. मंत्री अदिती तटकरे या सध्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांना हा मान मिळतो. पालकमंत्री पद आपल्याला मिळावे यासाठी भरतशेठ गोगावले हे आग्रही आहेत. पण त्यांना हे पद सारखं हुलकावणी देत आहे. तर गेल्यावेळी पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याचा दावा गोगावले यांनी केला होता. मानगाव येथे आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात त्यांनी हा दावा केला होता. पण त्यानंतरही रायगडच्या पालकमंत्रीपदाची घोषणा झालीच नाही. आता तर 15 ऑगस्ट अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे शिंदे सेनेतील अस्वस्थता उघड झाली आहे.

आमदार महेंद्र थोरवे यांची नाराजी

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भरत गोगावले यांची पालकमंत्री पदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. रायगड पालकमंत्री पदाचा तिढा दोन दिवसात सोडवा अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली आहे. शिंदे सेनेतील अस्वस्थता यानिमित्ताने समोर आली आहे. विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आले. त्यासाठी शिंदे सेनेने मदत केली तरी पालकमंत्री पदाचे गुऱ्हाळ कायम असल्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

भरतशेठ यांना पालकमंत्री करण्यासाठी सध्या जी काही दिरंगाई होत आहे. त्याविषयी मी सुद्धा जाहीर नाराजी व्यक्त करत आहे. आता 15 ऑगस्ट अगदी समोर आहे. अजूनही तुम्ही पालकमंत्री घोषित केलेला नाही. तीनही पक्षांची सत्ता आहे. मग पालकमंत्री पदाचं घोडं अडलं कुठं? हा आमच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. वरिष्ठांचा आदेश पाळून आम्ही विधान परिषद एकत्रित लढवली. मग आता पालकमंत्री पदाची अधिकृत का होत नाही, येत्या दोन दिवसात रायगडच्या पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा करा अशी मागणी थोरवे यांनी केली.

Follow Us
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष