AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma Video: रोहित शर्माने अचानक शेअर केला ‘तो’ व्हिडिओ, निवृत्तीची जोरदार चर्चा

रोहितने मागील काही महिन्यात आपल्या फिटनेसवरही खूप लक्ष दिले आहे. रोहितने क्रिकेटच्या मैदानावर अनेक युवा खेळाडूंना क्रिकेटबद्दलचे धडे दिले आहे. आता तो हे धडे फक्त कॅमेरासमोर देणार आहे.

Rohit Sharma Video: रोहित शर्माने अचानक शेअर केला 'तो' व्हिडिओ, निवृत्तीची जोरदार चर्चा
| Updated on: Aug 11, 2026 | 9:07 AM
Share

Rohit Sharma New Video: रोहित शर्मा नेहमीच मैदान गाजवताना पाहायला मिळाला आहे. रोहितचा मैदानावर नेहमीच आक्रमक आणि तितकाच मजेशीर स्वभाव पाहायला मिळाला आहे. रोहितच्या याच स्वभावामुळे चाहते त्याचे खूप मोठे फॅन आहे. आता रोहित त्याच्या निवृत्तीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. रोहित निवृत्त होईल अशी चर्चा सुरु आहे पण तो त्याचा आक्रमकपणा खेळात दिवसेंदिवस वाढवताना दिसत आहे. रोहितने मागील काही महिन्यात आपल्या फिटनेसवरही खूप लक्ष दिले आहे. रोहितने क्रिकेटच्या मैदानावर अनेक युवा खेळाडूंना क्रिकेटबद्दलचे धडे दिले आहे. आता तो हे धडे फक्त कॅमेरासमोर देणार आहे. रोहितने काही महिन्यांपूर्वी चाहत्यांना एक गुड न्यूज दिली होती. याचसंदर्भातील एक व्हिडिओ आता रोहितने सोशलल मीडियावर पुन्हा शेअर केला आहे. रोहितचा मजेशीर अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. पण तो फिल्डवर नाही तर कॅमेरासमोर.

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि माजी कर्णधार, रोहित शर्मा, त्याच्या प्रत्येक कृतीमुळे चाहत्यांचा लाडका आहे. चाहते त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीने मंत्रमुग्ध झाले आहेत. त्याची बोलण्याची शैलीही खूप आनंददायक आहे. आता, प्रेक्षकांना ही रोहित शर्मा-शैली एका टीव्ही शोमध्ये पाहायला मिळणार आहे. हा शो लवकरच प्रदर्शित होणार आहे. या शोशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. जाणून घ्या, त्यात काय विशेष आहे. आता रोहित शो करताना दिसणार आहे म्हणजे तो लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

रोहित शर्माच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो शोच्या निर्मात्यांना चित्रीकरण कसे करावे याबद्दल सल्ला देत आहे. व्हिडिओ पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “स्टेज तयार आहे. कॅमेरे तयार आहेत. लवकरच भेटू.” मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण विनोदबुद्धीसह पडद्यावर दिसणार आहे. ही शैली प्रेक्षकांसाठी एक पूर्णपणे नवीन अनुभव असेल. सोशल मीडिया युजर देखील या शोबद्दल उत्सुक आहेत आणि सोशल मीडियावर त्यावर उत्साहाने प्रतिक्रिया देत आहेत. आता हा शो कधी सुरु होईल याच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. त्यांना त्यांचा लाडक्या हिटमॅनला याही अंदाजात पाहायचे असल्यामुळे आता ते भलतेच उत्सुक आहेत.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी