AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: गॉल कसोटीत मोहम्मद सिराजसोबत दुसरा वेगवान गोलंदाज कोण? या दोन गोलंदाजांमध्ये सामना

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉलमध्ये होणार आहे. या सामन्यावर फिरकीची जादू असेल बोललं जात आहे. त्यामुळे टीम इंडियात फार तर दोन वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते.

IND vs SL: गॉल कसोटीत मोहम्मद सिराजसोबत दुसरा वेगवान गोलंदाज कोण? या दोन गोलंदाजांमध्ये सामना
IND vs SL: गॉल कसोटीत मोहम्मद सिराजसोबत दुसरा वेगवान गोलंदाज कोण? या दोन गोलंदाजांमध्ये सामना Image Credit source: PTI & Getty Images
| Updated on: Aug 10, 2026 | 10:55 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. हा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. मालिकेतील आघाडी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. असं असताना या सामन्यातील प्लेइंग 11 बाबत प्रचंड उत्सुकता आहे. श्रीलंकेतील खेळपट्ट्या या फिरकीला मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे प्लेइंग 11 कशी असेल याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. टीम इंडियात वेगवान गोलंदाजांना फार काही वाव नाही. त्यामुळे दोनच वेगवान गोलंदाज घेऊन टीम इंडिया उतरेल असं बोललं जात आहे. यात मोहम्मद सिराज याचं नाव निश्चित मानलं जात आहे. तर दुसरा वेगवान गोलंदाज कोण असेल? याची खलबतं सुरू आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये गुरनूर ब्रारचं पदार्पण होऊ शकतं किंवा अनुभवी गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळू शकते.

निवड करणार तरी कशी?

जसप्रीत बुमराह या कसोटी मालिकेला मुकल्याने वेगवान गोलंदाजीवर निर्णय घेणं वाटतं तितकं सोपं नाही. बुमराह या मालिकेत असता तर त्याला मोहम्मद सिराजची साथ लाभली असती. पण आता बुमराह नसल्याने सिराजला एका गोलंदाजाची साथ गरजेची आहे. त्यामुळे टीम इंडियात तीन दावेदार आहे. यापैकी आकिब नबीचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात लढत आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड करणं खूपच डोकेदुखीचं काम असणार आहे. कारण सराव सामन्यात दोघांच्या आकडेवारीत फारसा फरक नाही. पहिल्या डावात प्रसिद्ध कृष्णाने 8 षटकात 32 दावा दिल्या होत्या, पण विकेट मिळाली नाही. पण दुसऱ्या डावात 8 षटकात 35 धावा देत 1 विकेट काढली. गुरनूरने पहिल्या डावात 12 षटकात 49 धावा देत 1 विकेट आणि दुसऱ्या डावात 8 षटकात 37 धावा देत 2 विके काढल्या होत्या.

गुरनूर ब्रारचं पारडं जड

दोघांच्या गोलंदाजीच्या आकडेवारीत फारसा फरक नसला तरी गुरनूर ब्रार उजवा आहे. त्याच्या गोलंदाजीला प्रसिद्धच्या तुलनेत अधिक धार आहे. त्याने श्रीलंकन फलंदाजांना अडचणीत आणलं होतं. इतकंच काय तर तीन विकेट काढल्या. त्या तुलनेत प्रसिद्ध कृष्णा टीम इंडियात बऱ्याच संधी मिळाल्या पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. त्याचा मागचा रेकॉर्ड फार प्रभाव टाकणारा नाही. त्यामुळे मोहम्मद सिराजसोबत गुरनूर ब्रार हा जोडीदार असू शकतो. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. कारण गुरनूर फक्त गोलंदाजीत नाही तर फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. त्याने सराव सामन्यात त्याची झलक दाखवली आहे. एकाच षटकात 4 षटकार मारले होते.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...