AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ

Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ

| Updated on: Aug 10, 2026 | 6:17 PM
Share

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी प्रोमेनेड येथे भाजपकडून काही वेळापूर्वी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी प्रोमेनेड येथे भाजपकडून काही वेळापूर्वी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तरुणांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी या रॅलीत पिढीतील तरुणांचाही सहभाग होता.

रॅलीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी देशाचा जयजयकार केला. त्यानंतर उपस्थित गायकांसोबत त्यांनी देशभक्ती गीताला सुरुवात केली. कर्मा चित्रपटातील ‘दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिये’ हे प्रसिद्ध देशभक्ती गीत मुख्यमंत्र्यांनी गायले. त्यामुळे रॅलीतील वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले.

या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रॅलीच्या पार्श्वभूमीवर वरळी आणि परिसरात मुंबई पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

Published on: Aug 10, 2026 06:17 PM

Follow Us