AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडीने जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेक यांना पदावरून हटवलं

| Edited By: | Updated on: Feb 14, 2026 | 10:04 PM
Share

Maharashtra News LIVE Updates : जळगावच्या पारोळा तालुक्यातील अस्तित्वात नसलेल्या भाटपुरी या गावाच्या नावावर तब्बल 4 हजार 907 बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्या. तर पोहरादेवी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा दौरा रद्द होणार असल्याची माहिती आहे. क्रीड, राजकारण, मनरोंजन, देश-विदेशातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेता येतील.

Maharashtra News LIVE : चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडीने जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेक यांना पदावरून हटवलं

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज सकाळी जनता दरबार भरणार आहे. सहयोग सोसायटीमध्ये सकाळी जनता दरबाराला सुरूवात होणार आहे.अजित पवार हे देखील दर शनिवारी बारामतीमध्ये जनता दरबार घ्यायचे. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. पर्यटन विभाग व बंजारा विरासत संघ यांचा संयुक्त उपक्रम राज्यभरातून बंजारा बांधव याठिकाणी येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्रा पवार ,मंत्री संजय राठोड सह इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाशिवरात्रीला गर्दीचे कारण देत घृष्णेश्वराचे गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे गाभाऱ्यात प्रवेश करून घृष्णेश्वराचे दर्शन आणि स्पर्श करता येणार आहे. यासह देश विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्य घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Feb 2026 05:57 PM (IST)

    व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तरुणानं संपवलं आयुष्य

    व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गळफास घेऊन 23 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

    पिंपरी चिंचवड शहरामधील धक्कादायक घटना

    समर्थ संजय माळी वय 23 वर्षे असं  या तरुणानं नावं

    तरुण आपल्या मित्रांसोबत पिंपरी चिंचवड शहरात होता वास्तव्याला

  • 14 Feb 2026 05:55 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सहा जणांना सेवा पुरस्काराचे वितरण

    पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बंजारा समाजाच्या उत्थानासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सहा मान्यवरांना सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 50 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असा या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • 14 Feb 2026 05:53 PM (IST)

    भाजपाचे आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसमध्ये एअरगन ठेवणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

    भाजपाचे आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसमध्ये एअरगन ठेवणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

    रितेश संतोष होळकर असं एअरगन ठेवणाऱ्या तरुणाचं नाव

    आज सकाळी आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसमध्ये एक एअरगन आढळून आली होती

    त्यांनतर पोलिसांनी ती बॅग आणि एअरगन जप्त केली, तरुणालाही अटक

  • 14 Feb 2026 05:15 PM (IST)

    कल्याण परिमंडळ ३ ची ड्रग्स तस्करांवर मोठी कारवाई

    कल्याण परिमंडळ ३ ची ड्रग्स तस्करांवर मोठी कारवाई

    २.१५ कोटींचं एमडी व कोकेन जप्त

    नायजेरियन व्यक्तीसह तिन जणांना अटक

    डोंबिवलीतील कुंभार्ली, गणेशनगर परिसरात पाठलाग करून पोलिसांनी आरोपींना केलं अटक

  • 14 Feb 2026 04:54 PM (IST)

    नंदुरबार : महामार्गाच्या कामावर शेतकऱ्यांचा आक्षेप

    नंदुरबार जिल्ह्यात नॅशनल 752G हायवेच्या कामावर शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेत वाटवी येथे हायवेचे काम रोखले. जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

  • 14 Feb 2026 04:40 PM (IST)

    चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडीने जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेक यांना पदावरून हटवलं

    चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता स्थापन होण्यात वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांची अनुपस्थिती निर्णायक ठरली. पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत जाण्याचे निर्देश दिले असतानाही हे दोन्ही नगरसेवक सभेला अनुपस्थित राहिले. त्यामुळे भाजपचा महापौर अवघ्या एका मताने निवडून आला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने कारवाई करत जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेक यांना पदावरून मुक्त केले आहे.

  • 14 Feb 2026 04:25 PM (IST)

    पुणे : वाहतूक शाखेकडून 5 हजार वाहनचालकांवर कारवाई

    पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली आहे. ट्रिपल सीट फिरणाऱ्या 5 हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असीन 988 दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत जवळपास 1 कोटी 3 लाख 25 हजार इतका दंड वसूल केला आहे. ट्रिपल सीट प्रवास करू नका असं आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलं आहे.

  • 14 Feb 2026 04:09 PM (IST)

    अकोला : आज व्हॅलेंटाईन वीकची सांगता; दुकानांमध्ये तरुणाईची गर्दी

    व्हॅलेंटाईन डे निमित्त संपूर्ण आठवडाभर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध प्रकारचे टेडी, ग्रीटिंग कार्ड्स, गिफ्ट आयटम्स, खेळणी तसेच संदेशांनी सजवलेल्या भेटवस्तूंच्या खरेदीसाठी युवक-युवतींनी दुकानदारांकडे मोठी गर्दी केली होती. व्हॅलेंटाईन वीकच्या समारोपदिनी आजही बाजारपेठेत आपल्या आवडीच्या वस्तू खरेदीसाठी तरुणाईची चांगलीच लगबग आणि गर्दी पाहायला मिळत आहे.

  • 14 Feb 2026 03:54 PM (IST)

    मुलुंड मेट्रो दुर्घटनेतील पीडीतांची महापौरांनी घेतली भेट

    मुलुंड मेट्रो स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत पीडीतांच्या कुटुंबियांची महापौर रितू तावडे यांनी भेट घेतली.  महापौर तावडे आणि  स्थानिक आमदार मिहिर कोटेजा यांनी रुग्णालयात जाऊन पीडीतांची भेट घेतली.

  • 14 Feb 2026 02:45 PM (IST)

    हिंदुस्तानात टिपू सुल्तानच उदातित्करण सहन केलं जाणार नाही- प्रविण दरेकर

    टीकेची झोड ऊठेलच, हिंदुस्तानात टिपू सुल्तानच ऊदातित्करण सहन केलं जाणार नाही. अदित्य ठाकरे तुम्ही पण सत्तेत होतात, तेव्हा झोपा काढत होता का ? असे कसे चालेले, तुम्हाला मोठा नेता व्हायचा असेल तर मग असं राजकारण करू नका असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

  • 14 Feb 2026 02:30 PM (IST)

    संगमनेरमध्ये युवकाचा संशयास्पद मृत्यू

    अहिल्यानगर येथील संगमनेरमध्ये युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सुरज सूर्यभान शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे. काही लोकांनी सूरजच्या स्कूटीला धडक देऊन त्यालाच बेदम मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

  • 14 Feb 2026 02:15 PM (IST)

    मुलूंड मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

    मुलूंड येथील मेट्रोचा स्लॅब कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. मुलुंडच्या फायर बिग्रेड जवळ ही घटना घडली आहे.

  • 14 Feb 2026 01:48 PM (IST)

    आता विलीनीकरण होणार नाही- प्रफुल्ल पटेल

    दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांसमोर विलीनीकरणाच्या चर्चा… आमच्याशी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती… आता विलीनीकरण होणार नाही… अनौपचारिक गप्पांवेळी पटेलांचं वक्तव्य…

  • 14 Feb 2026 01:17 PM (IST)

    भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना कोर्टात हजर केलं

    भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना कोर्टात हजर केलं. विलास पाटील आणि महेश चौघुलेंच्या गटात झाला होता राडा. विलास पाटील भिवंडी महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत.

  • 14 Feb 2026 01:03 PM (IST)

    प्रकृती उत्तम पण शरद पवारांना डॉक्टरांचा मोठा सल्ला

    शरद पवारांना पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज.. पवारांवर मागील 5 दिवस रुबी रुग्णालयात उपचार…. शरद पवारांची प्रकृती उत्तम, रुबी हॉल रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती.. शरद पवारांना पुरेशी विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला..

  • 14 Feb 2026 12:58 PM (IST)

    संजय केणेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदुक

    भाजपाचे आमदार संजय केनेकर यांच्या छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकातील संपर्क कार्यालयात एका बॅगमध्ये बंदुक आढळले. हे पिस्टल काल रात्री कर्मचाऱ्यांनी बघितले होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

  • 14 Feb 2026 12:52 PM (IST)

    आगीत दुचाकी जळून खाक

    जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये लागलेला भीषण आगीचा व्हिडिओ समोर आला आहे. भीषण आगीत पार्किंग मध्ये उभ्या सर्व दुचाकी जळून खाक झाल्या असून सर्व दुचाकींचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. या भीषण आगीचे लोळ अपार्टमेंटच्या पहिल्या मधल्या पर्यंत पोहोचल्याने बालकनीतील रोप तसेच साहित्य देखील जळून खाक झाल्या आहेत. शॉर्ट सर्किट होईल अशी कुठलीही परिस्थिती पार्किंग मध्ये नसल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा संशय रहिवाशी नागरिकांनी व्यक्त केला आहे.

  • 14 Feb 2026 12:47 PM (IST)

    पवारांना राज्यसभेवर पाठवणार? हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं वक्तव्य

    शरद पवार राज्यसभा निवडणूक लढणार.यासंदर्भात जेव्हा बैठक होईल, तेव्हा यावर चर्चा होईल. यासंदर्भात महाविकास आघाडी मधे संवाद होण्याची गरज आहे .व्यापक चर्चा होणे गरजेचे असून त्यानंतर यावर बोलणे योग्य होईल, असे मोठे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

  • 14 Feb 2026 12:37 PM (IST)

    उपमपौरांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपकडून मागणी

    उपमपौरांनी लावलेल्या टिपू सुलतान यांच्या फोटो नंतर राजकीय पडसाद उमटले आहेत. भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. भाजपच्या शिष्टमंडळाकडून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाकडून मालेगाव अपर पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन केली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सेना शिंदे गटाच्या नेत्यांनी फोटो काढण्याची मागणी केल्यानंतर भाजपा कडून निवेदन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान यांचा कोथळा काढला तो फोटो घेऊन निवेदन देत तो फोटो देखील महापालिका कार्यालयात लावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

  • 14 Feb 2026 12:18 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परळीत आगमन

    महापशुधन एक्स्पोच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज परळीत दाखल झाले आहेत.शक्तीकुंज वसाहतीतील हेलिपॅड वर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले आहे. मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा महा पशुधन एक्सपोच्या कार्यक्रम स्थळाकडे रवाना झाले. परळीतील ओपळे मैदानात तीन दिवसीय महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे

  • 14 Feb 2026 12:10 PM (IST)

    जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ

    सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 600 रुपये तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची वाढ झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 590 रुपयांवर तर चांदीचे दर 2 लाख 62 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत

  • 14 Feb 2026 12:00 PM (IST)

    मंत्री झिरवळ कार्यक्रमाला न आल्यानं आयोजकांची फजिती

    नाशिकमध्ये मंत्री झिरवळांच्या उपस्थितीत ११ वाजता १ ले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन होत आहे. झिरवाळ उपस्थित नसल्याने त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे. आदिवासींच्या पहिल्याच संमेलनात रिकाम्या खुर्च्या आणि रिकामे व्यासपीठ दिसून आले. झिरवळांच्या कार्यालयातील क्लार्क राजेंद्र ढेरिंगेला एसीबीने लाच घेताना अटक केल्याने ते अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे.

  • 14 Feb 2026 11:50 AM (IST)

    उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा गणेश नाईकांना टोला

    डोंगर फस्त करणाऱ्यांनी एकनाथ शिंदेवर बोलू नये… एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर जनतेचा जनादेश घेऊन ६० आमदार निवडून आणलेत… गणेश नाईकांच्या एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर नीलम गोऱ्हे यांचा गणेश नाईक यांना टोला…

  • 14 Feb 2026 11:35 AM (IST)

    चर्नीरोड पुलासाठी भाजप आक्रमक, सैफी हाॅस्पिटल समोर आंदोलनास सुरवात

    चर्नीरोड पुलासाठी भाजप आक्रमक, सैफी हाॅस्पिटल समोर आंदोलनास सुरवात झाली आहे. चार वर्षांपूर्वी धोकादायक उड्डाणपूल पाडला पण दुसरा सुरू झाला नसल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. नवीन उड्डाणपुलाल विलंब होत असल्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढांसह स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी काही वेळात आंदोलन करणार.

  • 14 Feb 2026 11:20 AM (IST)

    राज्यात लवकरच काँग्रेस पदाधिकऱ्यामध्ये मोठे फेरबदल होणार..

    बुलढाणा : राज्यात लवकरच काँग्रेस पदाधिकऱ्यामध्ये मोठे फेरबदल होणार. 36 जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सह पदाधिकारी बदलणार आहेत.  काँग्रेसचा नगर पालिका, महानगर पालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभव समोर ठेवून संघटनेत बदल होणार. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 14 Feb 2026 11:06 AM (IST)

    नाशिक मुंबई महामार्गावर चालत्या रेंजरोवर कारने मध्यरात्री घेतला पेट

    नाशिक मुंबई महामार्गावर चालत्या रेंजरोवर कारने मध्यरा त्री पेट घेतला.  वाशिमहून त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना  पेट घेतला.  कारमध्ये राजस्थान येथील खासदार लुंबा रामजी चौधरी हे  प्रवास करत होते. काहीतरी जाळण्याचा वास आल्याने चालकाने कार  रस्त्याच्या बाजूला लावली. कारमधून सर्व जण खाली उतरले आणि कारने पेट घेतला. महामार्ग पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझविली मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

  • 14 Feb 2026 10:53 AM (IST)

    भाजपा आमदाराच्या कार्यालयात एका बॅगमध्ये पिस्तुल

    भाजपाचे आमदार संजय केनेकर यांच्या छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकातील संपर्क कार्यालयात एका बॅगमध्ये पिस्तुल आढळलं आहे. हे पिस्टल काल रात्री कर्मचाऱ्यांनी बघितले होते. हा प्रकार त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संजय केणेकर यांच्या कानावर घातला होता. आता संजय किनेकर या पिस्टलची पाहणी करत आहेत.

  • 14 Feb 2026 10:31 AM (IST)

    टिपू सुलतान यांचा फोटो हटवला

    मालेगाव महापालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटना व काही नगरसेवकांकडून तीव्र विरोध झाल्याने अखेर प्रशासनाने फोटो रात्रीच काढला. वाढता तणाव लक्षात घेता नगरसचिवांनी फोटो काढण्याचा निर्णय घेतला.

  • 14 Feb 2026 10:15 AM (IST)

    पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये महत्वाची बैठक

    सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा यांच्यात चर्चा. पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये ही महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासह पुढील वाटचाली संदर्भात चर्चा झाल्याची माहिती.

  • 14 Feb 2026 10:03 AM (IST)

    नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे – संजय राऊत

    नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कारवाई होऊ शकत नाही. मंत्रालयातील ACB च्या कारवाईवरुन राऊत यांची मागणी.

  • 14 Feb 2026 09:52 AM (IST)

    राष्ट्रवादीतील घडामोडींशी भाजपचा संबंध असेल – संजय राऊत

    राष्ट्रवादीतील घडामोडींशी भाजपचा संबंध असेल.  शिवसेना आणि काँग्रेसचा याच्याशी संबंध नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर आम्ही का बोलावं ? संजय राऊत यांचा सवाल

  • 14 Feb 2026 09:43 AM (IST)

    दादर पश्चिम स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर पालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू

    दादर पश्चिम स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर पालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू आहे.  दादर स्टेशन परिसर हा पूर्णपणे फेरीवाल्यांनी गिळंकृत केला होता. रस्ता किंवा फूटपाथवरून चालणंही शक्य नव्हतं. मात्र आता फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे सर्वांनीच मोकळा श्वास घेतला आहे.

  • 14 Feb 2026 09:21 AM (IST)

    जालना – पेट्रोल टाकून इंजिनियरचे घर जाळण्याचा प्रयत्न

    जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरातील एका तरुण इंजिनियरच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.

    ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून घर उध्वस्त करण्याच्या उद्देशाने समोरील भाग पेटवून देण्यात आलंं.  याप्रकरणीत व्यक्ती विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 14 Feb 2026 08:58 AM (IST)

    शिरूर तालुक्यातील न्हावरे चौफुला मार्गावर निमोणे येथे कारचा अपघात, तिघांचा मृत्यू

    पुणे –  शिरूर तालुक्यातील न्हावरे चौफुला मार्गावर निमोणे येथे कारचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये वडील आणि मुलीचा समावेश आहे, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.  शिरूर न्हावरे चौफुला मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 14 Feb 2026 08:57 AM (IST)

    पुरंदर, पुणे – मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात वीर यात्रेचा समारोप

    पुरंदर, पुणे –  मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात वीर यात्रेचा समारोप पार पडला.  हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.  सुरक्षेच्या कडक बंदोबस्तात आणि शिस्तबद्ध नियोजनात हा समारोप सोहळा यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

  • 14 Feb 2026 08:51 AM (IST)

    धाराशिव – अध्यक्षपदावरून भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष ?

    धाराशिव –  जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. तानाजी सावंत यांच्या शिवसेना गटाचा भाजपच्या संभाव्य अध्यक्ष उमेदवाराला विरोध असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सावंत गटाला बाजूला ठेवून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेच्या हालचाली करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

    अध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजप आमने-सामने असून, भाजपकडून राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील तर शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड समोर आहेत.

  • 14 Feb 2026 08:49 AM (IST)

    पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज…

    पुणे –  ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खोकल्याचा त्रास आणि इतर काही व्याधींमुळे, शरद पवार हे गेल्या 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शरद पवार यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याने, त्यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याचे समजते.

  • 14 Feb 2026 01:55 AM (IST)

    राज्यसभेबाबत आम्ही 3 पक्ष बसून निर्णय घेऊ- राऊत

    राज्यसभेबाबत आम्ही 3 पक्ष बसून निर्णय घेऊ.. मी शरद पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले मी राज्यसभेची निवडणूक लढवणार.. मविआकडे एक उमेदवार पाठवण्याइतपत संख्याबळ.. संजय राऊतांची माहिती..

Published On - Feb 14,2026 8:48 AM

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.