AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा

नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा

| Updated on: Aug 17, 2026 | 12:40 PM
Share

नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवरून आता ठाकरेंची सेना आक्रमक झाली. खड्ड्यांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिक पालिकेवर महामोर्चा. राजीव गांधी भवनपर्यंत मोर्चा काढून पालिका प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे. रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाकडून केवळ बैठका नको, ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येतेय. पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. पवन आपण पाहतोय ठाकरे सेनेचा पालिकेवर हा […]

नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवरून आता ठाकरेंची सेना आक्रमक झाली. खड्ड्यांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिक पालिकेवर महामोर्चा. राजीव गांधी भवनपर्यंत मोर्चा काढून पालिका प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे. रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाकडून केवळ बैठका नको, ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येतेय. पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. पवन आपण पाहतोय ठाकरे सेनेचा पालिकेवर हा महामोर्चा, काय सांगाल? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक शहरात रस्त्यांवर पडलेले असतील खड्डे असतील, याचबरोबर अन्य काही समस्या असतील, या समस्यांच्या विरोधातच खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेचा महापालिकेवरती जनआक्रोश मोर्चा जो आहे, तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर शिवसेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर आता या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये रस्त्यांच्या समस्यांमुळे त्रस्त असलेले नाशिककर असतील ते देखील सहभागी झालेले आहेत. मात्र नाशिक शहरात मागच्या गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांमध्ये अपघात होऊन जे बळी होतायत त्यांची मालिका सुरू आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी एक यमराज जो आहे तो देखील आपल्याला बघायला मिळत आहे.

त्याच्या हातामध्ये गदा असेल, चाबूक असेल तो देखील घेऊन आलेला आहे आणि मुक्काम पोस्ट नाशिक असं म्हणून तो या ठिकाणी यम जो आहे तो सर्वांचे लक्ष या मोर्चामध्ये वेधून घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर या मोर्चाची तयारी जी आहे ती आता संपूर्ण पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी देखील जमण्यास सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा नाशिक महापालिकेच्या दिशेनं रवाना होणार आहे. नक्कीच. धन्यवाद पवन तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर थोड्याच वेळात संजय राऊत हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. नाशिकमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आणि या विरोधात ठाकरे सेना आक्रमक झाली. ठाकरे सेनेचा पालिकेवर आता महामोर्चा निघालेला आहे. यमराजच्या वेशातील हा तरुण देखील सध्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. तर थोड्याच वेळात संजय राऊत हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि पालिकेवर हा महामोर्चा निघणार आहे. या खड्ड्यांमध्ये अपघात होऊन अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत आणि यानंतर आता ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे. नाशिकमध्ये अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांवरूनच ठाकरेंच्या सेनेने हा मुद्दा उचलून धरलेला आहे. अनेकांचे जीव गेलेले आहेत. आता तरी जागे व्हा अशा अशा आशयाचे बॅनर देखील या ठिकाणी आपण पाहिले. नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांवरून ठाकरेंच्या सेनेचा हा महामोर्चा निघालेला आहे. ठाकरे सेनेचा पालिकेवर हा महामोर्चा निघालेला आहे. मोठ्या प्रमाणात ठाकरे सेनेचे शिवसैनिक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत.

Published on: Aug 17, 2026 12:39 PM

Follow Us