AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींच्या भेटीला, दिल्लीत घडामोडींना वेग..

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीचे काही फोटो पुढे आली आहेत. राज्यातील विकास कामांबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केल्याचे कळतंय.

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींच्या भेटीला, दिल्लीत घडामोडींना वेग..
Devendra Fadnavis met Narendra Modi
| Updated on: Aug 17, 2026 | 1:18 PM
Share

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीचे फोटो पुढे आली आहेत. नरेंद्र मोदी अचानक मोदींच्या भेटीला पोहोचले. दिल्लीत ही भेट झाल्याची माहिती मिळतंय. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. शरद पवार यांचेही खासदार नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले होते. शरद पवार गट एनडीएमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा होती. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या 6 खासदारांपैकी दोन जणांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळणार असल्याचे सांगितले जातंय.

शिंदेंच्या भेटीनंतर आता देवेंद्र फडणवीसही मोदींच्या भेटीला पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेक महत्वाच्या मुद्द्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळतंय. राज्यातील विकास प्रकल्पांची माहिती नरेंद्र मोदी यांना दिली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत आहेत.

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा फोटो पुढे आला. ज्यात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांना बुके देताना दिसत आहेत. नरेंद्र मोदी सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती हिच्या रिसेप्शनला पोहोचले होते. यादरम्यान शरद पवार यांच्यासोबत गप्पा मारताना नरेंद्र मोदी दिसले. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आले.

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली. याबाबत काही माहिती ही पुढे येऊ शकली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांनी जवळपास 20 मिनिटे चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत अद्याप समजलेले नाही.

Follow Us
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह