इस्रायलला सर्वात मोठं यश! हमासचा टॉपचा कमांडर हल्ल्यात ठार, गुपचूप एअरस्ट्राईक करून विषय संपवला!
इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीनंतर करण्यात आलेल्या हल्ल्यात अबू युनिस मारला गेला. हमासची संघटना मजबूत करणे, दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करणे आणि ते प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती.

Israel And Hamas War : मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय. इस्रायली सैन्याने दक्षिण गाझामध्ये रात्रभर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हमासचा वरिष्ठ कमांडर समीर महमूद हसन अबू युनिस याला ठार केल्याचा दावा केला जातोय. अबू युनिस हा हमासच्या रफाह ब्रिगेडचा कमांडर होता. हमासनेही त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला असून, त्याच्यावर नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे हमासने सांगितेल आहे. अबू युनिस ठार झाल्यानंतर आता इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आणखी तीव्रा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष वाढला
इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीनंतर करण्यात आलेल्या हल्ल्यात अबू युनिस मारला गेला. हमासची संघटना मजबूत करणे, दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करणे आणि ते प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी त्याच्या आधीच्या कमांडरलाही इस्रायलने हवाई हल्ल्यात ठार केले होते. रविवारीही हमासच्या अन्य दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे इस्रायलने सांगितले.
येमेन आणि हुथी बंडखोरांतही वाद वाढला
दुसरीकडे येमेन आणि हुथी बंडखोर यांच्यातील संघर्षही तीव्र झाला आहे. येमेनची राजधानी सना येथे झालेल्या हवाई हल्ल्यात दोन महिला आणि दोन मुलांसह चौघे जखमी झाले आहेत. हुतींच्या आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्यासाठी सौदी अरेबियाला जबाबदार धरले आहे. मात्र, सौदीकडून यावर तातडीने प्रतिक्रिया आलेली नाही. दुसरीकडे, सौदीच्या लष्कराने हुतींकडून रियाधच्या दिशेने डागण्यात आलेली दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवाई संरक्षण यंत्रणेने नष्ट केल्याचा दावा केला आहे.
The IDF and Shin Bet confirm that the latest commander of Hamas’s Rafah Brigade, Samir Abu Younis, was killed in a strike in the southern Gaza Strip overnight. https://t.co/dwhlERswVw
— Emanuel (Mannie) Fabian (@manniefabian) November 15, 2026
इराणचा अमेरिकन हेलिकॉप्टर तळावर हल्ला
याचदरम्यान, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने बहरीनमधील अमेरिकेच्या हेलिकॉप्टर तळावरील रडार यंत्रणेवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. मात्र, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. बहरीनच्या सैन्यानेही अनेक इराणी क्षेपणास्त्रे आणि प्रक्षेपक लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आखाती देशांमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. भविष्यात नेमके काय काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
