AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: ‘असंभव को संभव करणारे अमित शाह..’, एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, विरोधकांवर तोफ डागली!

केंद्रीय गृहमंत्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या भूमीपूजन समारंभातही सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना राज्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या कामाचे कौतुक करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

Eknath Shinde: 'असंभव को संभव करणारे अमित शाह..', एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, विरोधकांवर तोफ डागली!
| Updated on: Nov 15, 2026 | 5:35 PM
Share

रणजित जाधव, प्रतिनिधी: DCM Eknath Shinde Speech Pune:  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर दाखल झाले आहेत. या दौऱ्यामध्ये अमित शाह यांनी पुण्यातील मुंढवा परिसरात असलेल्या भारत फोर्ज लिमिटेडला भेट दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या भूमीपूजन समारंभातही सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना राज्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या कामाचे कौतुक करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“तळेगावची भूमी उद्योगांसाठी चेतना देणारी आहे. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे, कंपनी पुन्हा सुरू होत आहे. इथे हजारो तरुणांना नोकरी मिळणार आहे. सहकार क्षेत्र त्यांनी डबघाईला आणली होती, अमित शहा यांनी डिलीट बटन दाबून पुन्हा सुरळीत केली आहे. त्यांनी सहकार क्षेत्र मजबुत केलं आहे. असंभव को संभव करणाऱ्या अमित शहा याना वंदन आहे,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचं कौतुक केले.

विरोधकांवर निशाणा! 

“विरोधकांना मोदी- शहा यांच्या नावाचा फोबिया झाला आहे. विरोधकांना मळमळ आणि जळजळ होत आहे. देशातील नक्षलवाद मोदी आणि शहा यांनी संपवला आहे. मागचे भ्रष्टाचारी सरकार होते, म्हणून कारखाने बंद पडले. 2014 नंतर बंद पडलेले कारखाने सुरू झाले आहेत. देशाचे महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन आहे. बंद पडलेले कारखाने सुरू होत ही काळाची गरज आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अमित शहा यांचा एक हात पुढे असतो,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टिका केली.

दरम्यान, राज्यासाठी हा प्लांट सुरु होणे राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी मी अमित शाह यांचे आभार मानतो.  अशा प्रकल्पासाठी नेहमीच त्यांची साथ असते, ते सहकार मंत्री झाल्यापासुन नवी सुरुवात झाली. त्यांच्या दुरदृष्टीने देशाला आणी सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर