AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन आठवड्यात तिसरे चक्रीवादळ तयार, ‘अकवान’ चा तीन राज्यांना बसणार फटका ?

बंगालच्या खाडीत तिसऱ्या चक्रीवादळाचा धोका तयार झाला आहे. आयएमडीच्या येत्या तीन दिवसात ‘अकवन’ हे चक्रीवादळ गंभीर स्वरुप धारण करु शकते. त्यामुळे किनारपट्टीवर भागाला अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तीन आठवड्यात तिसरे चक्रीवादळ तयार, ‘अकवान’ चा तीन राज्यांना बसणार फटका ?
Akvan Cyclone
| Updated on: Nov 15, 2026 | 5:38 PM
Share

चक्रीवादळ अर्नब आणि मुरासु याच्या नंतर बंगालच्या खाडीवर आता आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण होत आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण – पूर्व मध्ये एक कमी दबावाचे क्षेत्र तयार होत आहे.आणि येत्या दोन ते तीन दिवसात हे आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. आणि १६ नोव्हेंबरपर्यंत हा कमी दबावाचा पट्टा चक्रीवादळात परिवर्तित होण्याचा धोका आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार या चक्रीवादळाचे नाव ‘अकवान’ असणार आहे. यामुळे बंगालची खाडी, अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेट समूहाचील काही भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून समुद्र खवळण्याची शक्यता आहे.

इंडिया मेटियोरोलॉजिकल डिपार्टमेंटने (IMD) आपल्या नव्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की बंगालच्या उपसागराच्या वर तयार कमी दाबाचा एरिया एका डिप्रेशनमध्ये बदलून गेला आहे. आणि सकाळी ८.३० वाजेपर्यंत तीन तासात हे चक्रीवादळ १० kmph वेगाने उत्तर दिशेला गेले आहे. ही स्थिती ओदिशाच्या गोपालपूरहून १,१३० km दक्षिण-पूर्व मध्ये केंद्रित आहे.

हवामान विभागाने म्हटले आहे की याच्या उत्तर – उत्तर – पश्मिमेकडे दिशेने गेल्याने, १६ नोव्हेंबर रोजी दक्षिणेच्या मध्य भाग आणि त्याच्या किनाऱ्यावरील पश्चिम-मध्य बंगाल खाडीच्या वरती एक सायक्लोनिक वादळ आणखी वेगवान होणे आणि १७ नोव्हेंबर रोजी पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीवर एक गंभीर सायक्लोनिक वादळात त्याचे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की येत्या दोन दिवसात ही सिस्टीम आणखी वेगवान होऊ शकते आणि उत्तर -पश्चिमच्या दिशेने आंध्राच्या किनारपट्टीच्या दिशेने वाढू शकते.

केव्हा वेग पकडणार सायक्लॉन ‘अकवन’?

बंगालच्या खडीच्या दक्षिण-पूर्वेत तयार झालेला कमी दाबाचा पट्ट्याचा भाग उत्तर -पश्चिमेच्या दिशेने वाढू शकतो आणि आणखीन मजबूत होऊन सोमवार, १६ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत बंगालच्या खाडीच्या दक्षिण आणि त्याला लागून पश्चिम-मध्य भागात एका चक्रीवादळात त्याचे परिवर्तन होऊ शकतो.

या चक्रवादळाच्या पार्श्वभूमिवर ओदीशा, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओदिशा सरकारने देखील सर्व जिल्हे, खासकरुन दक्षिण आणि किनारपट्टीच्या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. आणि कोणत्याही प्रतिकूल हवामानासाठी लढण्यास सज्ज रहा असा आदेश जाहीर झाला आहे. कारण बंगालच्या खाडीवर तीन आठवड्यात तिसरे चक्रीवादळ येऊ शकते.

आपत्कालिन व्यवस्थापन प्रकरणाचे सुरेश पुजारी यांनी सांगितले की सर्व ऑक्टोबरमध्ये अर्णब चक्रीवादळाने दक्षिण जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला होता आणि या महिन्याच्या सुरुवातीला मुरासू चक्रीवादळामुळे या भागात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे हे खबरदारीचे उपाय योजले जात आहेत.

16 नोव्हेंबरपर्यंत मच्छीमारांना समुद्रातून बाहेर येण्याचे आदेश

मात्र, आतापर्यंत हवामान खात्याने येणाऱ्या चक्रीवादळाचे लँडफॉलचा अंदाज वर्तवलेला नाही. परंतू मागील अनुभव पाहून आणि जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे असे आपत्कालिन व्यवस्थापन प्रकरणाचे सुरेश पुजारी यांनी म्हटले आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की सर्व जिल्ह्यात २४ तास सक्रीय कंट्रोल रुम सुरु राहणार आहेत. NDRF, ODRAF आणि अग्निशमन आणि आपात्कालिन कर्मचाऱ्यांना बचाव आणि मदतीच्या कार्यांसाठी सज्ज ठेवण्याच आले आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार दक्षिण ओदीशाच्या जिल्ह्यातील लोकांना या संभाव्य चक्रीवादळासंदर्भात जागरुक करण्यासाठी आधीच कँपेन सुरु केले आहे. ओदिशाचा हा भाग आंध्रप्रदेशात २८ ऑक्टोबर रोजी आलेल्या सायक्लॉन अर्नबच्या वेळी हा भाग भयानक पुराने मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला होता.

प्रशासनाने मच्छीमारांना १६ नोव्हेंबरपर्यंत किनाऱ्यावर परतण्याचा अलर्ट जारी केला आहे. मस्त्य विभागाला या तारखेने नंतर समुद्रात कोणालाही जाण्यास मनाई करुन तशी तजवीज करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर