AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड, अजित पवार गटाच्या नेत्याचा तडकाफडकी संन्यास, मंत्रीपदाची वाट पाहिली पण…

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी एक घडामोड घडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय सन्यास जाहीर केला आहे.

बीडच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड, अजित पवार गटाच्या नेत्याचा तडकाफडकी संन्यास, मंत्रीपदाची वाट पाहिली पण...
prakash solanke political retirementImage Credit source: social media
| Updated on: Nov 15, 2026 | 5:48 PM
Share

एकीकडे राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या घडामोडींवर विविध विधानं केली जात आहेत. विविध नेते विविध तर्कवितर्क लावत आहेत. तर दुसरीकडे आजा राज्यातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या बीडमधून मोठी घडामोड समोर आली आहे. बीडच्या माजलगावच्या राजकारणातून ही मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. आपण स्वतः निवडणूक लढवणार नसून पुतण्या जयसिंह सोळंके यांना उमेदवारी दिली जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे सोळंके यांनी आपला राजकीय वारसदार निश्चित केलाय. याबद्दल त्यांनी थेट मंचावरुनच घोषणा केली आहे.

एका विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना प्रकाश सोळंके यांनी ही घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार म्हणून जनतेसमोर येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, त्यांनी सक्रिय राजकारणातून पूर्ण निवृत्ती घेतल्याचं स्पष्ट केलेलं नाही.

नेमकं काय म्हणाले प्रकाश सोळंके?

आमदार प्रकाश सोळंकेंची निवृत्तीची घोषणा, आमदार प्रकाश सोळंकेंनी केला आपला राजकीय वारसदार घोषित. प्रकाश सोळंकेंचा मोठा राजकीय निर्णय, पुतण्या जयसिंह सोळंकेंना विधानसभेची संधी दिली आहे. बीडच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी एका विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी थेट आपल्या राजकीय वारसदाराची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी स्वतः उमेदवार म्हणून तुमच्यासमोर येणार नाही, तर माझा पुतण्या जयसिंग सोळंके यांना आमच्याकडून उमेदवारी दिली जाईल, असं मोठं विधान प्रकाश सोळंके यांनी केलं आहे. त्यांच्या या घोषणेमुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सोळंके यांनी राजकारणातून माघार घेण्याचे संकेत दिले असून, आता माजलगावच्या राजकारणात जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वाची नवी इनिंग सुरू होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर