AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 ऑगस्टपर्यंत सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा…; मनोज जरांगे यांची शेवटची वार्निंग

मनोज जरांगे यांनी पुन्हा ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच आंदोलनासाठी देखील मराठा बांधवांना महत्वाच्या सूचना दिल्या.

28 ऑगस्टपर्यंत सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा...; मनोज जरांगे यांची शेवटची वार्निंग
manoj jarangeImage Credit source: tv9
| Updated on: Aug 17, 2026 | 12:40 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी पुन्हा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. आता त्यांनी 29 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. तसेच जरांगेंनी मराठा बांधवांनाही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आता मराठ्यांनी पुन्हा आंदोलनाची तयारी करावी, अशा सूचना मनोज जरांगे यांनी दिल्या आहेत. तसेच ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.

मनोज जरांगे यांनी रुग्णालयातूनच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मनोज जरांगे म्हणाले, ‘ मराठवाड्याच्या आणि विदर्भातील काही भागात दौरा असणार आहे. दोन दिवसांत दौरा घोषित केला जाईल. माझी तब्येत बरी झाल्यावर दौरा होईल. मला शक्य झालं नाही, तर आंदोलनाची जबाबदारी समाजाने घ्यावी. समाजातील लेकरांसाठी बांधवांनी पेटून उठलं पाहिजे. मराठा समाजाने दबून राहू नका, कोणाला भिऊ नका. कोणाच्या दबावाखाली वागू नका. जे पोरं आक्रमक झाले झाले आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुणाला भिऊ नका… अधिकारी असो राजकीय नेता असो.. जो अन्याय करेल त्या विरोधात पेटून उठा. 29 तारखेपासून पुन्हा जीवघेणी लढाई सुरू होणार आहे. त्यामुळे दौरा झाला नाही, तर नाराज होऊ नका’.

‘मी इतका बोलतो. मात्र कोणाच्या लेकी बाळीवर आणि महिलांवर बोललो नाही. मी कधीच हिंदू किंवा इतर समाजाच्या लेकी बाईला कधीच बोललो नाही. मराठ्याच्या लेकीविषयी कोणी बोलत असेल. तर शंभर टक्के भुरटी औलाद आहे. आम्ही कोणाच्या लेकींविषयी बद्दल बोललो नाही. दुसरी बाजू दाखवायची का? तुमचं दाखवलं तर वासुदेव होईल. मराठ्याची पोरं सोपे नाही. तुम्ही वाईट थराला गेलाय. आम्हाला वाईट ठरवलं जात आहे. खरंतर तुम्ही सुरुवात केली, आता मराठे सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार आहे, असा इशारा जरांगे यांनी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना दिला.

‘आम्ही आई पळून गेली म्हटलो का? मी म्हटलं का, त्याची आई दुसऱ्याच्या घरात घुसली. मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो, त्यांच्या आई बहिणीवर बोललो नाही. पळून गेली, घरात घुसली, ही भाषा आम्ही करत नाही. माणसाला नेत्याला बोलणारच. तुम्ही जर लेकी बाळीवर बोलणार असेल तर आता सुट्टी नाही, असा पुन्हा इशारा जरांगे यांनी दिला.

सरकारला दिला मोठा इशारा

‘सर्व केस मागे घेतल्या पाहिजे. 29 ऑगस्टनंतर एक शब्दही मी ऐकणार नाही. जे चार चार प्रमाणपत्र तुम्ही अवैध दिलेले आहेत. ते मला वैध पाहिजे शिंदेंच्या सांगण्यावरून शिरसाट यांनी ते केलं आहे. आरक्षण एक दिवस लेट…मात्र 29 ऑगस्टनंतर मात्र आता सरकारची जिरवणार, अशी टीका जरांगे यांनी केली.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?