AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: राजकीय अजेंडा घेऊन याल तर… अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलनाचा एल्गार? मनोज जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची मराठा अभ्यासकांसोबत अंतरवाली सराटीत बैठक सुरू आहे. उपचार सुरू असतानाच त्यांनी अचानक सराटी जवळ केली. 29 ऑगस्ट ही आंदोलनाची तारीख आता जवळ येऊन ठेपली आहे. सरकारविरोधात त्यांची तोफ धडाडत आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात हे प्रकर्षाने दिसले.

Manoj Jarange: राजकीय अजेंडा घेऊन याल तर... अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलनाचा एल्गार? मनोज जरांगेंचा थेट इशारा
मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणImage Credit source: टीव्ही ९मराठी
| Updated on: Aug 16, 2026 | 7:15 PM
Share

मराठा अभ्यासकांसोबत मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत बैठक सुरू झाली आहे. मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटपून मनोज जरांगे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना ताप आणि इतर त्रास सुरू होता. पण अचानक उपचार मध्येच थांबवत त्यांनी अंतरवाली सराटी जवळ केली. त्यांच्या या भूमिकेने अनेकांना नवल आणि चिंता वाटली. गेल्या आठवड्यात त्यांनी सरकारविरोधात सातत्याने विधानं केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे दिसून आले. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीतून त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारने मराठ्यांनी पुन्हा फसवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शासकीय परिपत्रकातील आणि निर्णयातील त्रुटी काय हे दाखवण्यासाठी आणि कुठे काय चुकलं हे समजून घेण्यासाठी आज मराठा अभ्यासकांसोबत ते चर्चा करत आहेत.

चुका असतील तर दुरूस्त करुयात

जीआर चुकला असं नंतर बोंबलता कशाला, काही चुकलं तर येऊन सांगा. सुधारणा असतील सुचवा. काय झाल आता, अजून कसं होत नाही? असे सवाल करणाऱ्यांना जरांगे पाटील यांनी झोंबणारा सवाल केला. या बैठकीत अभ्यासकांनी आता बोलावं. सन्मानं या आणि सन्मानं जा. आपल्या समाजाचे खूप हाल करण्यात आले. चूक झाली असेल तर ती सांगा. दुरुस्त करूयात. सुधारणा केल्याने आपण मोठे होऊत. नाहीतर नाहक मोठी दरी निर्माण होईल. तुमच्या आणि माझ्या भांडणात समाजाचं नुकसान होऊ नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

यावेळी अभ्यासकांनी त्यांना हैदराबाद गॅझेटपासून ते सातारा गॅझेटपर्यंत, व्हॅलिडिटीचा विषय, सगेसोयऱ्याचा उल्लेख जीआरमध्ये नसल्याबाबत त्यांची मतं मांडली. हरकती नोंदवल्या. कुठे काय चुकलं, याची माहिती दिली. यावेळी अभ्यासकांनी त्यांच्यासमोर काही बाबी आणल्या. काही त्रुटींबाबत त्यांना माहिती दिली. जरांगे पाटील सरकारचे प्रतिनिधींशी बोलण्यापूर्वी या सर्व बाबी त्यांच्यासमोर मांडण्याची शक्यता आहे.

राजकीय अजेंडा आणू नका

अभ्यासकांनी केवळ समजासाठी यावं, राजकीय अजेंडा म्हणून येऊ नये असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आज अनेक अभ्यासक अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांनी त्यांची मतं मांडली. या बैठकीला स्त्री आणि पुरुषांची मोठी गर्दी उसळली आहे. आजच्या बैठकीनंतर जरांगे पाटील काय भूमिका मांडतात हे समोर येईल. त्याकडे सरकारचेच नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. प्रकृती ठिक नसल्याने दौरा अर्धवट सोडल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. तब्येत ठिक असेल तर विदर्भ, उर्वरीत पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 29 ऑगस्टपूर्वी जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात आणि काय अपेक्षा व्यक्त करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...