AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?

Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?

| Updated on: Sep 30, 2026 | 6:51 PM
Share

मुंबईतील अँटिलिया प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित केला आहे. एनआयएने वाझेच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्यानंतर न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

मुंबईतील प्रसिद्ध अँटिलिया प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. सत्र न्यायालयाने मंजूर केलेला त्यांचा जामीन उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित केला आहे. या निर्णयामुळे सचिन वाझे यांचा ठाणे कारागृहातील मुक्काम वाढला आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने साडेपाच वर्षांच्या दीर्घ कारावासाच्या आधारावर सचिन वाझे यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या जामिनाविरोधात तात्काळ उच्च न्यायालयात धाव घेतली.

सुरुवातीला न्यायाधीश सारंग कोतवाल आणि नंतर न्यायाधीश भारती डांगरे यांनी या प्रकरणाची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. आज दुपारी एनआयएने पुन्हा दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने एनआयएची ही मागणी मान्य करत सत्र न्यायालयाच्या जामीन आदेशाला ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. यामुळे अँटिलिया प्रकरणात सचिन वाझे यांना तात्काळ दिलासा मिळालेला नाही आणि त्यांना काही काळ तुरुंगातच राहावे लागणार आहे.

Published on: Sep 30, 2026 06:51 PM

Follow Us