AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Tips : किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट? कायमची सुटका करण्यासाठी करा हे उपाय

किचनमध्ये अन्नाचे कण, तेलकटपणा, कचरा आणि पाणी उपलब्ध असेल तर झुरळांना तिथे राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळू शकते. त्यामुळे स्वच्छतेसोबत अन्न आणि पाण्याचे स्रोत कमी करणं महत्त्वाचं आहे.

Kitchen Tips : किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट? कायमची सुटका करण्यासाठी करा हे उपाय
cockroach Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 9:23 PM
Share

किचनमध्ये कितीही स्वच्छता ठेवली तरी कुठून ना कुठून झुरळं येतातचं. मग त्यांना कायमचे नष्ट करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते ते वेगळंच.सिंकखाली, कपाटांच्या कोपऱ्यात, गॅसच्या मागे किंवा ओलसर ठिकाणी झुरळांचा जास्त वावर दिसतो. किचनमध्ये अन्नपदार्थ असल्यामुळे तिकडे झुरळं जास्त आर्कषित होतात. काही सोपे उपाय केल्याने तु्मच्या किचनची झुरळांपासून कायमची सुटका होऊ शकते.

किचन नेहमी स्वच्छ ठेवा

झुरळं कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती किचनची स्वच्छता. किचनमधील अन्नाचे कण, तेलकटपणा, कचरा वेळीच साफ करा. गॅस आणि ओटा रोज स्वच्छा पाण्याने पुसा. कचरा जास्त वेळ घरात ठेवू नका.सिंकजवळची जागा शक्यतो कोरडी ठेवा. अन्नपदार्थ उघडे ठेवणे टाळा. या सगळ्यामुळे किचनमधील झुरळं आपोआप कमी होतील.

साखर आणि बेकिंग सोड्याचा उपाय

साखर आणि बेकिंग सोडा समप्रमाणात घेऊन मिश्रण तयार करा. हे मिश्रण झुरळं जास्त दिसतात अशा ठिकाणी ठेवा. यामुळे झुरळे येण्याचे प्रमाण कमी होईल. याच्या वासामुळे झुरळं दूर पळतील.

तमालपत्राचा वास

तमालपत्राचा वास खूप तीव्र असतो. हा वास झुरळांना आवडत नाही. त्यामुळे तमालपत्राचा चुरा करून किचनच्या कोपऱ्यात ठेवा.यामुळे झुरळांचे प्रमाण कमी होईल.

लवंग – तमालपत्राचा स्प्रे

8 ते 10 लवंगा आणि 2 तमालपत्र पाण्यात उकळून ते मिश्रण थंड करा. त्यात व्हिनेगर मिसळून स्प्रे बाटलीत भरा. किचनमधील कोपऱ्यावर, झुरळं येतात अशा ठिकाणी स्प्रे करा. असे दोन तीन दिवस केल्याने झुरळ येणार नाहीत.

कचरा जास्त वेळ ठेवू नका

किचनमध्ये कापलेल्या भाज्यांचा ओला कचरा जास्त वेळ ठेवू नका. ओलसरपणामुळेच घरात झुरळे वाढतात. त्यामुळे दररोज रात्री कचरा टाकून द्या.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...