AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...

ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत…

| Updated on: Sep 30, 2026 | 5:22 PM
Share

ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या घटनेनंतर कुटुंबीय आणि समर्थकांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर मृतदेहासह ठिय्या आंदोलन केले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही आणि सूत्रधारांचा शोध लागत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. पोलीस कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीय आणि समर्थक तीव्र आंदोलन करत आहेत आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यासमोर पुर्णेकर यांचा मृतदेह घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आहेत. आरोपींना अटक होत नाही आणि या प्रकरणातील सूत्रधार निष्पन्न होत नाहीत तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, जमावाने घटनास्थळी ठिय्या दिला आहे.

मनोरमानगरमध्ये बाळूदादा या नावाने परिचित असलेल्या प्रदीप पुर्णेकर यांच्यावर रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास गोळीबार करून धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जे. जे. मार्ग रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव ठाण्यात आणण्यात आले आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कुटुंबीय आणि समर्थकांनी केला आहे.

Published on: Sep 30, 2026 05:21 PM

Follow Us