हे झाड घराच्या जवळ नकोच, आसपास साप असतातच, सापांच्या हक्काचा निवारा
निसर्गात अशा काही विशिष्ट वनस्पती, झाडं असतात ज्यांच्यामध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे साप अशा झाडांकडे आकर्षित होतो. अनेकदा तुम्ही देखील अनुभव घेतला असेल काही विशिष्ट झाडं ज्या परिसरात आहेत, त्या परिसरामध्ये सापांचा वावर अधिक असतो. अनेकदा अशी झाडं सापांचं आश्रयस्थान देखील बनतात.

सापांच्या प्रजननाचा हंगाम सुरू झाला आहे. सर्वसाधारणपणे याच काळात अनेक साप पिल्लांना जन्म देतात. तर काही साप हे अंडी घालतात. हा सापांच्या प्रजननाचा हंगाम असल्यामुळे या काळात साप हे अधिक आक्रमक झालेले असतात. अशी काही विशिष्ट ठिकाणं आहेत, ज्या जागेची निवड साप आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी निवड करतात. अशा काळात या ठिकाणी जाणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं असतं. अशा काही विशिष्ट वनस्पती आहेत, झाडं आहेत. त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे आणि संरचनेमुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. काही विशिष्ट झाडं तर अशी असतात, ज्या परिसरामध्ये ही झाडं आहेत, त्या परिसरामध्ये तुम्हाला हमखास एखादा का होत नाही साप दिसून येतोच. या परिसरामध्ये कायम सापांचा वावर असतो.
असंच एक झाड आहे, ते म्हणजे वडाचं. वडाच्या झाडाचा घेर हा इतर झाडांच्या तुलनेत प्रचंड मोठा असतो. काही काही झाडं तर हे खूप जुने म्हणजे 100 वर्षांपूर्वेचे देखील आहेत. अशा झाडांना अनेक ठिकाणी नैसर्गिक रित्या पोकळी निर्माण झालेली असते. अशा झाडांच्या पोकळीमध्ये सांपाना नैसर्गिकरित्या निवारा मिळतो. तसेच या झाडांवर विविध पक्ष्यांचे घरटे असतात. या झाडाचे फळं खाण्यासाठी देखील अनेक पक्षी येत असतात. अशा पक्ष्यांना हा साप आपली शिकार बनवतो. पक्षी हे सापाचं आवडतं खाद्द आहे. कधी-कधी साप या पक्ष्याच्या घरट्यामधील अंड्यांवर देखील ताव मारतो. त्यामुळे साप सहसा अशी जागा सोडत नाही. त्यामुळे या झाडाच्या आसपास कुठे न कुठे साप असतोच.
तसेच अनेकदा वडाचं झाड हे पानथळ जागेवर उगवतं, या झाडाच्या परिसरात पाणवठे असतात. अशा ठिकाणी बेडूक देखील येतात. साप या बेडकाला देखील आपली शिकार बनवतो. बिळापेक्षा या सापांना झाडाच्या पोकळीमध्ये आश्रय घेणं हे अधिक सुरक्षित वाटतं. त्यामुळे साप या झाडाच्या आश्रयाला येतात. त्यामुळे अशी झाडं घराच्या आसपास असतील तर काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कुठे साप दिसला तर त्याला मारू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून सुरक्षित जागी सोडतील.
