धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते…
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानात एका वैमानिकाने ते क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. हवेतच दोन वैमानिकांमध्ये मोठे भांडण होऊन चाकूहल्ला झाला. विमान ३० सेकंदात १४ हजार फूट खाली आले. प्रवाशांनी प्रसंगावधान राखत मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर विमान सौदी अरेबियामध्ये उतरवण्यात आले.
दुबईहून इस्राईलची राजधानी तेल अवीवकडे निघालेल्या फ्लाय दुबईच्या विमानात मोठा गोंधळ निर्माण झाला. सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असताना दोन वैमानिकांमध्ये तीव्र वाद झाला. एका वैमानिकाने विमानाचा ताबा घेऊन ते क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुसऱ्या वैमानिकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, क्रॅश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैमानिकाने त्याच्यावर हल्ला केला.
वादामुळे विमान अवघ्या ३० सेकंदात तब्बल १४ हजार फुटांनी खाली आले. या गोंधळावेळी कॉकपीटचा दरवाजा उघडला गेला आणि आतमधील रक्त पाहून इस्रायली प्रवाशांनी तत्परता दाखवली. त्यांनी क्रू मेंबर्सच्या मदतीने हल्ला करणाऱ्या वैमानिकाला पकडले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. विमानात जवळपास १५० प्रवासी होते. सकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी विमानाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला हायजॅकचा संदेश पाठवला, त्यानंतर संपर्क तुटला. इस्राईलची लढाऊ विमाने हवेत झेपावली, पण काही वेळातच संपर्क पूर्ववत झाला. अखेर सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हे विमान सौदी अरेबियातील ताबुक विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.
Published on: Sep 30, 2026 06:25 PM
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...

