MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा केली. यामध्ये गट क परीक्षेतील जागा दुप्पट-तिप्पट करणे, सर्व परीक्षा ऑफलाइन घेणे आणि राजस्थानच्या धर्तीवर परीक्षा कार्ड प्रणाली लागू करणे या प्रमुख मागण्या मान्य झाल्या. MPSC आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या राजीनाम्याबाबत कलम ३१७ नुसार न्यायालयीन चौकशी सुरू झाली असून, इतिहासातील सर्वात मोठी पदभरती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आगामी ३ जानेवारी रोजी होणाऱ्या गट क परीक्षेमध्ये सध्याच्या जागांच्या तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट जागा वाढवल्या जाणार आहेत. यानंतरच्या सर्व MPSC परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले.
ऑनलाइन परीक्षांचा प्रश्नच उद्भवणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. राजस्थान लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर १०० रुपयांचे कार्ड प्रणाली महाराष्ट्रामध्येही लागू केली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभर विविध परीक्षा देता येतील. या कार्डचा दर ठरवताना विविध बाबींचा विचार केला जाईल. कृषी सेवा पेपर रीचेकिंगची मागणीही मान्य करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेदरम्यान राज्यपालांना पाठवलेले लोकसेवा आयोगासंदर्भातील पत्र विद्यार्थ्यांना दाखवले, ज्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट झाली. विद्यार्थी संघटनांनी या निर्णयांवर समाधान व्यक्त केले आहे.
Published on: Sep 30, 2026 07:13 PM
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...

