तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
प्रदीप पुर्णेकर प्रकरणानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत. पुर्णेकर कुटुंबीयांनी आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप करत मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी केली. जोपर्यंत मुख्य सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. या प्रकरणी ठाकरे आणि राऊत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत..
प्रदीप पुर्णेकर प्रकरणानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत. पुर्णेकर कुटुंबीयांनी आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप करत मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी केली. जोपर्यंत मुख्य सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. या प्रकरणी ठाकरे आणि राऊत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.
दिवंगत प्रदीप पुर्णेकर यांचं पार्थिव कापूरबावडी पोलीस स्टेशनसमोर ठेवण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या मते, आरोपींना संरक्षण दिले जात असून, हे राज्यात असे पहिलेच उदाहरण आहे, जिथे आरोपींना संरक्षण मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी ठाकरे आणि राऊत यांनी केली आहे. गेल्या काही काळापासून संजय राऊत आणि पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर गुन्हेगार विदेशात कुठे पळून गेला तर काय करणार? असं म्हणत तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
Published on: Sep 30, 2026 07:34 PM
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड

